शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

सुभाषचंद्र बोस मैदान नियमबाह्य भाड्याने देणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई कोणी करायची ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 19:37 IST

भाईंदर पश्चिमेचे सुभाषचंद्र बोस मैदान हे शहरातील खेळाडू , नवोदित खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिकांना खेळण्यासाठीचे एक मोठे मैदान आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका प्रशासनातले काही अधिकारी हे कायदे - नियम आणि आधीच्या आयुक्तांचे चांगले निर्णय जाणीवपूर्वक नवीन आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत नाहीत . त्यातूनच पालिकेचे सुभाषचंद्र बोस मैदान हे एका सामन्यासाठी तब्बल ४ महिने नियमबाह्यपणे भाड्याने दिले गेले आहे . त्यामुळे आधीच्या आयुक्तांच्या निर्णया नुसार शिस्तभंगाची कारवाई संबंधित अधिकाऱ्यांवर कोण  करणार ? असा प्रश्न केला जात आहे . 

भाईंदर पश्चिमेचे सुभाषचंद्र बोस मैदान हे शहरातील खेळाडू , नवोदित खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिकांना खेळण्यासाठीचे एक मोठे मैदान आहे . परंतु सदर मैदान हे नेहमीच भाड्याने दिले जाते . त्यातही शनिवार , रविवार आणि सुट्टीच्या दिवशी खेळण्यास जास्त मुलं व नागरिक येत असताना तर मैदान सर्रास भाडयाने दिले जायचे . 

२०१८ मध्ये देखील पालिकेने भाजपाच्या सीएम चषक साठी नियमबाह्यपणे मैदान भाड्याने दिल्याने लोकमतने त्या संदर्भात बातम्या दिल्या होत्या . महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमच्या ३७ अ नुसार मैदान हे कोणत्याही संघटना, संघ, व्यक्ती आदींना १२ दिवसांपेक्षा अधिक दिवस देता येणार नाही. तसेच वर्षातून केवळ ३० दिवसच भाड्याने देता येईल, अशी स्पष्ट तरतूद असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आणून दिले होते .

त्याची गांभीर्याने दाखल  तत्कालीन आयुक्त बालाजी खतगावकर यांनी घेतली . ३ डिसेम्बर २०१८ रोजीच्या आदेशाने त्यांनी खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचा विचार करत शनिवार , रविवार ह्या सुट्टीच्या दिवशी मैदान भाड्याने देऊ नये . तसेच एका वर्षात ३० दिवसांपेक्षा अधिक आणि सलग १२ दिवस मैदान भाड्याने देऊ नये असे बजावले होते . आदेशाचा भंग झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे खतगावकर यांनी स्पष्ट केले होते . 

तसे असताना महापालिकेच्या मिळकत विभाग आणि प्रभाग समिती कार्यालयाने तत्कालीन आयुक्तांचे आदेश तसेच कायद्यातील तरतुदी व न्यायालयाचा संदर्भ जाणीवपूर्वक नवीन आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला नाही का ? असा प्रश्न केला जात आहे . शिवाय संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातील उपलब्ध आदेशांची पूर्ण कल्पना असताना बोस मैदान हे एका संस्थेला ३० मे पासून तब्बल ९ ऑक्टोबर पर्यंत टप्या टप्याने विनामूल्य भाड्याने दिले. त्यामुळे आता खतगावकर यांच्या त्या निर्णयानुसार तसेच कायदे नियमांचे उल्लंघन केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईची मागणी होत आहे .