शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सुसज्ज ग्रामीण रुग्णालय कधी? सोळा वर्षांपासून बोईसरमधील रेंगाळलेला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 1:13 AM

तब्बल सोळा वर्षांपासून विविध कारणांनी रेंगाळलेला बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या जमिनीचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आला आहे.

- पंकज राऊतबोईसर : तब्बल सोळा वर्षांपासून विविध कारणांनी रेंगाळलेला बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या जमिनीचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आला असून ३ आॅगस्टला पालघर न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक अडचणींमुळे ग्रामीण रुग्णालयाला दीड दशक विलंब झाल्याने लाखो आदिवासींबरोबरच गोरगरीब तसेच कामगार वर्ग सुसज्ज सेवेपासून वंचित राहिला आहे.उडलँड प्रोजेक्ट फॉरेस्टमधील ०.९९/०.९९ हेक्टर जागा डहाणू विभागाच्या उपवनसंरक्षकांनी ९ नोव्हेंबर २०१७ ते २७ मार्च २०१८ दरम्यान ग्रामीण रुग्णालयासाठी दिली. या अडीच एकर जागेचा सात बारा पालघर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नावे करण्यात आला. शासनाने वनविभागातर्फे ग्रामीण रुग्णालयासाठी जागा दिली. परंतु सदर जागेवर तारापूर अणुऊर्जा केंद्र (टॅप्स) आणि बीएआरसी (एनपीसीआयएल) यांच्या विभागाने आपला हक्क मागत थेट न्यायालयात दाद मागितली. दरम्यानच्या काळात ७ ते ८ वेळा सुनावणी झाली, २ ते ३ वेळा टॅप्सचे अधिकारी सुनावणीला आले नाहीत. मात्र १६ जुलैच्या सुनावणीला ते उपस्थित होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंची भूमिका ऐकून घेतली असून ३ आॅगस्टला होणाºया सुनावणीत अंतिम निर्णय येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सध्याची जागा अत्यंत गैरसोयीची३० खाटांचे बोईसर ग्रामीण रु ग्णालय मंजूर होऊन दीड दशक झाले. परंतु जमिनीचा प्रश्न न सुटल्याने सुसज्ज रु ग्णालय उभारण्यासाठी विलंब होत आहे. आज ज्या छोट्याशा इमारतीत रुग्णालय सुरू आहे ती जागा अत्यंत गैरसोयीची असून तेथे ओपीडी व प्रसूती व्यतिरिक्त काहीही विभाग सुरू नाहीत. आजघडीला तेथे ओपीडीचे सुमारे ३०० रुग्ण येत आहेत. परंतु सुसज्ज ग्रामीण रु ग्णालयाअभावी गोर गरिबांना महागड्या व खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात.३ आॅगस्टला होणाºया पालघर न्यायालयात सुनावणी होणार असून अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे- राजेंद्र केळकर, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक, पालघर२००३ ला मिळाली होती मान्यताठाणे जिल्ह्यामध्ये १६ आॅक्टोबर २००३ रोजी तत्कालीन पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत बोईसर ग्रामीण रुग्णालयाला मान्यता देण्यात आल्यानंतर ७ फेब्रुवारी, २००४ ला ठाणे जिल्हा शल्य चिकित्सकांनी बोईसर ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पत्राद्वारे ग्रामीण रु ग्णालय उभारणीस मान्यता मिळाली असून रुग्णालयाची मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थानी बांधणेसाठी गावाच्या मध्यभागी ५ ते ७ एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती पत्र पाठविले होते.दुर्दैवाचा भाग असा की २००३ पासून २०१० पर्यंत बोईसर ग्रामीण रुग्णालयाला जागा उपलब्ध करून देण्याबाबत कुणीही गांभीर्याने न घेतल्याने मंजूर झालेले रुग्णालय कागदावरच राहिले. याचे कुणालाही सोयर सुतक नव्हते. २०११ साली रु ग्णालयाच्या जमिनीसाठी पत्रव्यवहार सुरू झाल्यानंतर फक्त आणि फक्त बैठका झाल्या.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलpalgharपालघर