आरोग्य केंद्राचे ग्रामीण रु ग्णालयात रूपांतर कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:07 AM2019-11-08T00:07:03+5:302019-11-08T00:07:15+5:30

सुविधांअभावी परळीतील रुग्ण त्रस्त : आॅगस्ट महिन्यात मिळाली होती मंजुरी; आरोग्य केंद्रातील काही पदे रिक्त

When to transform a health center into a rural RS hospital? | आरोग्य केंद्राचे ग्रामीण रु ग्णालयात रूपांतर कधी?

आरोग्य केंद्राचे ग्रामीण रु ग्णालयात रूपांतर कधी?

Next

वाडा : वाडा तालुक्यातील ग्रामीण तसेच दुर्गम भागातील परळी हे आरोग्य केंद्र. या केंद्रात रुग्णांची मोठी गर्दी असून या आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्याच्या प्रस्तावाला आॅगस्ट महिन्यात मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही हे आरोग्य केंद्र आहे तसेच असून दिवसेंदिवस येथे येणाऱ्या रुग्णांची सुविधांअभावी परवड होत आहे.

२० हजार लोकसंख्येला साधारणत: एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते. मात्र, परळी आरोग्यकेंद्राअंतर्गत तब्बल ६५, ६०३ इतकी लोकसंख्या आहे. तर २ हजार लोकसंख्येला उपकेंद्र असायला हवे. पण प्रत्यक्षात येथे १० हजार एवढ्या लोकसंख्येला एक उपकेंद्र आहे. साहजिकच हा भार सहन करण्याची क्षमता आरोग्यकेंद्रात नाही. मात्र तरीही परळी आरोग्य केंद्र रु ग्णांना सेवा देत आहे.
वाडा ग्रामीण रुग्णालयानंतर त्रिंबकेश्वर मार्गावरील परळी हे लोकांना आरोग्य सेवा देणारे एकमेव केंद्र आहे. यावर असलेला लोकसंख्येचा भार लक्षात घेता ५ आॅगस्ट २०१९ रोजी परळी आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात रूपांतर होण्याला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही याबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसते आहे.
परळी आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर झाल्यास सहाजिकच सुसज्ज इमारत, सोयीसुविधा, तज्ञ वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग, शस्त्रक्रिया विभाग, एक्स - रे विभाग, रक्तपेढी अशा अनेक सेवा लोकांना उपलब्ध होतील. शिवाय, वाडा आणि ठाणे येथे उपचारांसाठी जाण्याची जोखीमही कमी होईल.

सध्या परळी आरोग्य केंद्रात २०० च्या आसपास ओपीडी असून महिन्याला २० ते २५ महिलांची प्रसूती होत असते. असे असले तरी येथे ५ आरोग्य सेविका, मानिवली येथे आरोग्य सेवक तर अन्य पदे रिक्त आहेत. रुग्णांना सेवा देण्यावर याचा परिणाम होत असतो. शिवाय, आरोग्य केंद्राच्या इमारतीतही अनेक समस्या असून विजेची कामे तातडीने करणे गरजेचे आहे असे वैद्यकीय अधिकारी डॉ. यतिष पाटील यांनी सांगितले.

ग्रामीण रुग्णालय उभारणे हा खरेतर वरिष्ठ पातळीवरील विषय असून आरोग्य केंद्र अन्य जागी हलविणे आणि आरोग्य केंद्राची जागा ग्रामीण रु ग्णालयाला स्थलांतरित करणे ही एक प्रक्रि या आहे. याबाबत एक ठराव पंचायत समितीच्या बैठकीत घेतला जाईल, मग याबाबत पुढील कार्यवाही होईल.
- डॉ. संजय बुरपल्ले, तालुका आरोग्य अधिकारी

Web Title: When to transform a health center into a rural RS hospital?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.