कचऱ्याचा तिढा कायम जागोजागी कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:38 AM2019-03-28T00:38:08+5:302019-03-28T00:38:26+5:30

मंगळवारी झालेल्या डंम्पींग ग्राडंऊच्या मुदद्यावरून मुख्याधिकारी यांनी सफाई कामगारांना कच-याच्या गाड्या नगराध्यक्षा यांच्या घरासमोर उभ्या केल्याने झालेल्या वादाचा तिढा अद्यापपर्यत न सुटल्याने शहरातील कच-याचे ढीग वाढले असून शहरातील नागरिकांना आता अस्वच्छतेशी सामना करावा लागत आहे.

 Waste Removal Waste | कचऱ्याचा तिढा कायम जागोजागी कचऱ्याचे ढीग

कचऱ्याचा तिढा कायम जागोजागी कचऱ्याचे ढीग

Next

वाडा : मंगळवारी झालेल्या डंम्पींग ग्राडंऊच्या मुदद्यावरून मुख्याधिकारी यांनी सफाई कामगारांना कचºयाच्या गाड्या नगराध्यक्षा यांच्या घरासमोर उभ्या केल्याने झालेल्या वादाचा तिढा अद्यापपर्यत न सुटल्याने शहरातील कच-याचे ढीग वाढले असून शहरातील नागरिकांना आता अस्वच्छतेशी सामना करावा लागत आहे.
वाडा शहराची लोकसंख्या २५ ते ३० हजारांच्या आसपास असून भाजी मंडई, किराणा दुकान, मच्छी मार्केट, निवासी सकुंले यामधून सुमारे ७ ते ८ टन कचरा दररोज उचलला जातो. पंरतु डम्पिंग ग्राऊंडच नसल्याने गेल्या दोन दिवसांपासूनचा हा कचरा उचलला न गेल्याने शहरात जागोजागी कचºयाचे ढीग पडलेले दिसत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन मोकाट जनावरे व कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास शहरातील नागरिकांना अस्वच्छतेशी व आरोग्य विषयक समस्यांशी सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील कचरा टाकण्या संदर्भात नगराध्यक्षा नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यात एकमत होत नसल्याने डंम्पींग ग्राऊडचा प्रश्न गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित आहे. तात्पुरते स्वरूपात वाडा भिवंडी रस्त्यालगत हा कचरा नगरपंचायत टाकत असे. पंरतु या कचºयामुळे तिथे मोकाट जनावरांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती. कचरा पेटवल्यानंतर होणारा धुर महामार्गावर पसरत असल्याने रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले होते. तसेच, यामुळे वारंवार किरकोळ अपघात ही होत होते. काही दिवसांपूर्वी गांध्रे येथील एका युवकाचा या ठिकाणी अपघात झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी कचरा टाकण्यास मनाई केल्याने डंम्पींग ग्राऊडचा प्रश्न एैरणीवर आला आहे.

गत दोन दिवसांतील निर्णय प्रक्रिया
यासंदर्भात नगरपंचायतीने तातडीची बैठक बोलावून डंम्पींग ग्राऊड बाबत निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी पूर्वी घेतलेल्या भाडे तत्वावरील जागेच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे व तो पर्यंत तात्पुरते स्वरूपात अन्यत्र कचरा टाकण्यासाठी एकमताने निर्णय झाला होता. पंरतु त्या जागेवरही कचरा टाकण्यास विरोध झाल्याने मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांनी कचºयाच्या गाड्या थेट नगराध्यक्षांच्या दारात उभ्या केल्या होत्या.

Web Title:  Waste Removal Waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.