शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

नशेडींची गावकऱ्यांकडून धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 02:36 IST

वसई तालुक्यातील खोचिवडे येथील अमली पदार्थाचे सेवन करणाºया मुलाने आत्महत्या केल्याने नायगाव, खोचिवडे व उमेळा येथील ग्रामस्थांनी एकत्र येत रविवारी नशेडींना यथेच्छ चोप दिला. रविवारी सर्वांनी बैठक घेऊन या विरोधात मिशन उभी करण्यात आली.

नालासोपारा  - वसई तालुक्यातील खोचिवडे येथील अमली पदार्थाचे सेवन करणाºया मुलाने आत्महत्या केल्याने नायगाव, खोचिवडे व उमेळा येथील ग्रामस्थांनी एकत्र येत रविवारी नशेडींना यथेच्छ चोप दिला. रविवारी सर्वांनी बैठक घेऊन या विरोधात मिशन उभी करण्यात आली. खोचिवडे परिसरात व्यसनाधिनता तुलनेने जास्त असल्याने तेथे तपासणी करण्यात आली व नशा करताना जे जे दिसले त्यांची धुलाई करण्यात आली. या बाबत वसई गाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.खोचिवडे येथे राहणारा उदित पाठक हा तरूण अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेला होता. त्याला या अमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी कुटुंबियांनी त्याला शिरसाड येथील व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले होते. मात्र, तेथे त्याने नैराश्यात येऊन गळफास घेतला. या घटनेने व्यथीत झालेले ग्रामस्थ एकत्र येऊन या पूढे कुणीही व्यसनी होणार नाही यासाठी त्यांनी मुठी आवळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक सभा घेतली व या अमली पदार्थ पुरवणाºयांवर कायदेशीर कारवाई करायची असा निर्णय घेतला.ड्रग्ज माफियांवर वचक बसावा म्हणून ग्रामस्थांकडून यापुढेही असे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामस्थ हेमंत मसणेकर यांनी सांगितले. नायगांव पश्चिम परिसरात अमली पदार्थ विक्र ी करणाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या व्यसनाच्या आहारी गेले आहेत, त्यांच्या घरी जाऊन ग्रामस्थांनी प्रबोधन केले.या मोहिमेत नायगाव कोळीवाड्या नजिकच्या अमोलनगर, विजयपार्क, डायस परेरा नगर, मरियम नगरच्या रहिवाशांनीही भाग घेतला होता. यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले.पुरवठादारांना वाळीत टाकाखोचिवडे येथील या अमली पदार्थाचा पुरवठा करत असल्याचे कळताच ग्रामस्थ त्यांच्या घरी धडकले आणि त्यांनाही समज दिली, पण ते कुटुंबीय ग्रामस्थांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने अमली पदार्थ घेणारे व देणारे यांना व त्यांच्या कुटूंबीयांचा वाळीत टाकावे, अशी सूचनाही काही ग्रामस्थांनी यावेळी केली.या कुटूंबीयांच्या विरोधात वसई पोलिसात या अगोदरही तक्र ारी करण्यात आल्या असताना कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. यावेळी परिसरात शोध घेतला असता काही तरूण नशा करताना आढळून आले होते. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. भावी पिढी या व्यसनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी गावकºयांनी पावले उचलली आहेत.नायगाव स्टेशन परिसरात खुलेआम अमली पदार्थ विक्र ी : नायगांव स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात चरस, गांजा आणि अफूसारख्या अमली पदार्थाचे अड्डे आहेत. या मादक पदार्थांची विक्री करण्यासाठी ड्रग्ज माफीयांनी तरूण महाविद्यालयीन तरूणांना हेरायला सुरूवात केली आहे. सुरूवातीला ते या तरूणांना अल्पदरात चरस,गांजा,अफू व हेरोईन उपलब्ध करून देत असतात. मात्र, एकदा चटक लागल्यावर हि तरूण मुले अमली पदार्थ सेवनाच्या आहारी जातात. विशेष म्हणजे हे माफिया या अमली पदार्थाचे सेवन कसे करायचे याचे धडे ही देत असतात. एकदा का हे तरूण अमली पदार्थाच्या आहारी गेले की, चरस, गांजा हवा असेल तर तुमच्या मित्रांनाही घेऊन या अशी अट घालतात.पोलीस दलाकडून अमली पदार्थ विक्री करणाºयांविरोधात कारवाई सुरुच असते. शुक्रवारीच तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संतोष भूवन येथून सव्वा किलो गांजा पकडला होता. शाळा महाविद्यालयांबाहेर पोलीस गुप्तपणे लक्ष ठेऊन आहेत. मात्र, या नागरिकांनीही सतर्कता दाखविणे गरजेचे आहे.- विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधिक्षक, वसई

टॅग्स :Vasai Virarवसई विरार