रणरणत्या उन्हात विजयदिन साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 00:40 IST2019-05-07T00:40:07+5:302019-05-07T00:40:18+5:30
तांदुळवाडी गडावरील बहुतेक पिण्याच्या टाक्यांचे पुरातत्वीय दृष्टीने संवर्धन न झाल्याने पाण्याची साठवणूक होत नसल्याने किल्ल्याच्या एकूण संवर्धनासाठी नवीन आराखडा तयार करण्यासाठी अभ्यासक श्रीदत्त राऊत ह्यांच्या सहकार्याने अनेक दुर्गिमत्रांनी तांदुळवाडी किल्ल्याला भेट दिली.

रणरणत्या उन्हात विजयदिन साजरा
पालघर - तांदुळवाडी गडावरील बहुतेक पिण्याच्या टाक्यांचे पुरातत्वीय दृष्टीने संवर्धन न झाल्याने पाण्याची साठवणूक होत नसल्याने किल्ल्याच्या एकूण संवर्धनासाठी नवीन आराखडा तयार करण्यासाठी अभ्यासक श्रीदत्त राऊत ह्यांच्या सहकार्याने अनेक दुर्गिमत्रांनी तांदुळवाडी किल्ल्याला भेट दिली.
नरवीर चिमाजी अप्पांच्या गौरवशाली वसईच्या मोहिमेतील एक महत्त्वाचा वनदुर्ग म्हणून पालघर जिह्यातील तांदुळवाडी दुर्ग इतिहास प्रसिद्ध आहे. सन १७३७ मध्ये चिमाजीअप्पाच्या उत्तर कोकणातील मोहिमेत विठ्ठल विश्वनाथ व आवजी कवडे यांनी मे १७३७ रोजी तांदुळवाडी गड पोर्तुगीजांकडून जिंकला. या घटनेस यंदा २८२ वर्षे पूर्ण झाली असून यंदाचा हा दिवस तांदुळवाडी गड विजयदिन ठरला. किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत दिनांक ४ मे २०१९ शनिवार चैत्र कृ ३० रोजी तांदुळवाडी गडाच्या विजयदिनाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर उपक्र मात स्थानिक युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर परिवाराच्या दुर्गिमत्रांनी सिक्रय सहभाग नोंदवला. वाढत्या उन्हाचा प्रभाव वाढत असतानाही एकूण ११ दुर्गिमत्रांनी सकाळी ८ वाजता तांदुळवाडी गडाच्या सोंड वाटेची चढाई सुरू केली. दिवसभराच्या उपक्र मात वास्तुदेवता पूजन, इतिहास मार्गदर्शन सफर, संवर्धन मोहिमेची दिशा, ज्ञात अज्ञात इतिहासाची पाने, भगवा ध्वज मानवंदना, महादरवाजा पूजन इत्यादीं कार्यक्र म हाती घेण्यात आले. तांदुळवाडी गडाच्या मुख्य महादरवाजा बुरु जाचा परिसर दुर्गिमत्रांनी तोरणे लावून सुशोभित केलेला होता. यावेळी महादरवाज्यावर शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे व शस्त्र पूजन करण्यात आले. तांदुळवाडी गडावरील बहुतेक पिण्याच्या टाक्यांचे पुरातत्वीय दृष्टीने संवर्धन न झाल्याने गडावरील पाण्याची गैरसोय वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले. यात बहुतेक पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांच्या संवर्धनासाठी नवीन आराखडा तयार करावा लागणार असे लक्षात आले. सदर मोहिमेत किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी सहभागी दुर्गिमत्रांना मार्गदर्शन केले.
युवा शक्ती प्रतिष्ठानचे प्रतिनिधी प्रीतम पाटील यांनी तांदुळवाडी गडाच्या बालेकिल्ला वास्तूमधील मूळ देवस्थानाची सध्या झालेली दुरवस्था यावर एकित्रतपणे श्रमदान करण्याचे आवाहन केले. तर प्रतिनिधी मानसी शिरगावकर यानी तांदुळवाडी गडाची खडतर चढाई व गडावरील पाण्याची दुरावस्था लक्षात घेता आगामी काळात स्थानिक दुर्गिमत्रांच्या सक्र ीय सहभागातून संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार असल्याचे मत व्यक्त केले.