महावितरणवर आज वसईकरांचा मोर्चा
By Admin | Updated: March 18, 2017 03:08 IST2017-03-18T03:08:43+5:302017-03-18T03:08:43+5:30
महावितरणच्या वसईतील भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी शनिवारी जनआंदोलन समिती पारनाक्यावर असलेल्या महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत.

महावितरणवर आज वसईकरांचा मोर्चा
वसर्ई : महावितरणच्या वसईतील भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी शनिवारी जनआंदोलन समिती पारनाक्यावर असलेल्या महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत. अवास्तव बिले, बिले वेळेत न पाठवणे, रिडींग न घेता बिल पाठवणे यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. कार्यालयात तक्रार करावयास जाणाऱ्यांना कर्मचारी अपमानास्पद वागणूक देतात. बिले भरा नाही तर लाईट बंद करू असा दमही दिला जातो. अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. म्हणून महावितरणच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे.