शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

वसईकरांना मिळणार अधिक दर्जेदार वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 21:00 IST

'ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देण्यास बांधील असनाऱ्या महावितरणने वसई तालुक्यातील वीज यंत्रणा अद्यावत करण्याच्या दृष्टीने विविध कामे हातात घेतली आहेत

वसई -  'ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देण्यास बांधील असनाऱ्या महावितरणने वसई तालुक्यातील वीज यंत्रणा अद्यावत करण्याच्या दृष्टीने विविध कामे हातात घेतली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत कंत्राटदारांना ही कामे पुढील तीन महिन्यात पूर्ण करण्याचे सक्त आदेश कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी दिले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेवर वाढत्या ग्राहक संख्येमुळे बऱ्याच वेळा ताण येऊन यंत्रणेत बिघाड होतो. यामुळे ग्राहकांच्या वीज पुरवठ्यात व्यत्यय येतो तसेच महावितरणचेही आर्थिक नुकसान होते. या बाबी लक्षात घेऊन कल्याण परिमंडलाचे नवनियुक्त मुख्य अभियंता रफिक शेख यांनी वसई करता तीन महिन्याचा अॅक्शन प्लान तयार केला आहे. याकरता दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना(डीडीयुजीजेवाय) व एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प(आयपीडीएस) या योजनांमधून विविध कामे केली जाणार आहेत. या कामाचा लाभ वसई विभागातील सुमारे ३लाख ग्राहकांना होणार आहे.

कामन परिसर - सहा नवीन वीज वाहिण्या

महावितरणमार्फत कामन परिसरास विना व्यत्यय वीज पुरवठा करण्याच्या दृष्टीने पोमन स्विचिंग स्टेशन(ता.वसई) येथून नवीन सहा नवीन वीज वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या सहा नवीन वीज वाहिन्याद्वारे कामन परिसरातील एकूण चार वेगवेगळ्या भागात वीज पुरवठा करण्यात येणार आहे. हे काम दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजने अंतर्गत करण्यात येणार आहे. सध्या कामन परिसराचा वीज पुरवठा कामन फिडर व बापाने फिडर यावरून होतो. कामन फिडरचा पुरवठा हा ५० किमी लांब असलेल्या अग्रवाल स्विचिंग स्टेशन मधून येतो. या स्विचिंग स्टेशनवर ३६०अॅम्पीयरचा भार आहे. तर बापाने फिडरचा पुरवठा हा ३५ किमी लांब असलेल्या जुचंद्रा स्विचिंग स्टेशन मधून येतो. या स्विचिंग स्टेशनवर १८०अॅम्पीयरचा भार आहे.

या कामाचा लाभ पोमन औद्योगिक वसाहत, कामन, कोल्ही, खिंडीपाडा, बापाने, चिंचोटी गाव, देवदल सागपाडा, आयेशा कंपाऊंड, पटेल इंडस्ट्रीयल इस्टेट, शिलोत्तर, नागळे, महाजनपाडा, डोंगरीपाडा, मोरी, पोमन, भेंडीपाडा, कामन रेल्वे स्टेशन, बेबीपाडा गाव इत्यादी परिसरास होणार आहे.

वसई गाव परिसर - सहा नवीन वीज वाहिण्या

वसई गाव परिसरास महावितरणच्या फिडर क्रमांक ३ व फिडर क्रमांक ६ वरून होतो. सध्या फिडर क्रमांक तीन व सहाला सुमारे पाच ते साडेपाच  किमी. लांब असलेल्या वसई येथील महापारेषणच्या उपकेंद्रातून पुरवठा होतो. या केंद्रावर ४२० अॅम्पीयरचा भार आहे. महावितरणमार्फत वसई गाव परिसरास विना व्यत्यय वीज पुरवठा करण्याच्या दृष्टीने वसईगाव स्विचिंग स्टेशन(पारनाका)(ता.वसई) येथून नवीन सहा नवीन वीज वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. हे काम एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प(आयपीडीएस) या योजनेमधून केले जाणार आहे. या सहा केबल टाकल्यामुळे फिडर क्रमांक ३ व फिडर क्रमांक ६ वरील अतिरिक्त ताण कमी होणार आहे. याचबरोबर या सहा केबलचा फायदा वसई फिडरलाही होणार असून या फिडर वरील २४० अॅम्पीयरचा भार कमी होणार आहे. 

या कामामुळे पापडी, सागरशेत, तामतलाव परिसर, रमेडी, भास्कर आळी, हत्तीमोहल्ला परिसर, पाचूबंदर, लांगीबंदर, किल्लाबंदर, कोळीवाडा परिसर, वसई कोर्ट परिसर आदी भागास विना व्यत्यय वीज पुरवठा देणे शक्य होणार आहे.