शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वसई महिला स्पेशल पुन्हा सुरू, आमदारांचे प्रयत्न सफल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 03:03 IST

वसईहून सुटणारी महिला विशेष लोकल मंगळवारपासून पुन्हा सुरु झाल्याने महिलांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. बहुजन विकास आघाडीने यासाठी पुढाकार घेतला.

विरार : वसईहून सुटणारी महिला विशेष लोकल मंगळवारपासून पुन्हा सुरु झाल्याने महिलांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. बहुजन विकास आघाडीने यासाठी पुढाकार घेतला. रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी ही लोकल पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. मात्र ती सुरु होण्याचे श्रेय घेण्याची चढाओढही सुरु झाली होती.सहा महिन्यापूर्वी सुरु करण्यात आलेली महिला विशेष लोकल १ नोव्हेंबरला बंद करण्यात आली होती. वसई नायगाव मधील महिलांना ही लोकल सोयीस्कर असल्यामुळे व यामुळे त्यांना आरामात प्रवास करता यावा यासाठी महिलांकडून लोकलची पुन्हा मागणी केली गेली होती. हि लोकल २५डिसेंबरला सकाळी सुरु करण्यात आली. यावेळी बीजेपी कार्यकर्त्यांनी लोकलवर पक्षाचा बॅनर लावून ‘‘जय हिंद’’, ‘‘नारी शक्ती झिंदाबाद’’, इत्यादी घोषणा दिल्या. मीरा भार्इंदर मध्ये देखील अशीच चडाओढ पाहायला मिळाली. ९.०६ची महिला विशेष लोकल 1 आॅक्टोबर पासून विरार हून सोडण्यात येत आली असल्याने, मीरा-भायंदर इथल्या महिलांनी नाराजी व्यक्त केली. त्यासाठी शिवसेनेचे राजन विचारे यांनी प्रयत्न केले होते दोन्ही पक्षांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतल्या व लोकल आमच्याच प्रयत्नांनी सुरु झाल्याचे दावे केले. २५ डिसेंबर पासून मीरा-भायंदर इथून देखील ९.०६ ची लोकल पुन्हा सुरु करण्यात आली. यात राजकीय पक्षांची स्पर्धा सर्वत्र पाह्यला मिळाली.सामाजिक कार्य पेक्षा हे राजकीय कार्य जास्त होते असे दिसून आले. ९.०६ च्या महिला विशेषचे श्रेय शिवसेनेने घेतले. दोन्ही लोकल चा फायदा उकलण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांत चढाओढ दिसून आली.सामाजिक कार्य करत असताना ते शांतपणे व्हावे अशी म्हण असली तरी याठिकाणी महिलांना मदत केल्या नंतर त्याचा गाजावाजा करण्यात आला. भार्इंदर लोकलचे उद्घाटन खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले. राजकीय पक्ष स्वत:चे श्रेय घेताना दिसत होते.महिलांसाठी हि लोकल पुन्हा सुरु केली ही कौतुकाची बाब असली तरी मूळात ती रद्द होऊ दिलीच कशाला या प्रश्नाचे उत्तर मात्र एकाही राजकीय पक्षाकडे आज नव्हते.हि लोकल सुरु होण्याचे श्रेय कोणीही घेत असले तरीही, प्रत्यक्षात युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी रेल्वे मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हि लोकल सुरु करण्याची मागणी केली होती आणि त्याला मंत्र्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला.- आजीव पाटील,संघटक, बहुजन विकास आघाडी

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलVasai Virarवसई विरार