शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

वसई-विरार : धोकादायक इमारतीतील रहिवाशांचे पुनर्वसन केव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:24 IST

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने आता या धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटीस जरी जारी केल्या

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या केलेल्या सर्वेक्षणात एकूण ७३५ इमारतींपैकी २७२ इमारती या अतिधोकादायक तर ४६३ इमारती या धोकादायक असल्याची धक्कादायक व गंभीर बाब उघडकीस आली आहे. विशेष बाब म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने आता या धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना बळजबरीने बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. बळाचा वापर करून आवश्यकता वाटल्यास पोलिसांच्या साहाय्याने या रहिवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. हा या रहिवाशांवर घोर अन्याय असून वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने या रहिवाशांच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यांचे युद्धपातळीवर पुनर्वसन करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडीचे पालघर जिल्हा अध्यक्ष आणि पालघर जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य अशोक गजानन शेळके यांनी केली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडे रितसर अर्ज करून या गंभीर विषयाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे.

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने आता या धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटीस जरी जारी केल्या असल्या तरी हे रहिवाशी घरे खाली करून नेमके जाणार कुठे? हा प्रश्न निर्माण होतो. घरभाडे वाढल्यामुळे भाड्याने घर घेणे अथवा स्वखर्चाने नवीन घर घेण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे नवीन घर घेणे सर्वच रहिवाशांना परवडणारे नाही आणि दुसरा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध नाही. शिवाय आता शाळा/महाविद्यालय सुरु होणार आहेत. अशा वेळी त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती असल्यामुळे हे रहिवासी घरे खाली करण्यास तयार होत नाहीत. वास्तविक पाहता या धोकादायक इमारतीमधील बेघर झालेल्या रहिवाशांसाठी ट्रान्झिट कॅम्प बांधून देण्याची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची आहे. धोकादायक इमारत दुरुस्त होईपर्यंत अथवा पुन्हा तयार होईपर्यंत राहण्यासाठी पर्याय नसलेल्या रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्प बांधून देण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने यापूर्वी दिले होते. मात्र यासंदर्भात पुढे कोणतीच ठोस पावले उचलली गेली नाहीत. शिवाय महानगरपालिका प्रशासनाकडे जी रात्र निवारा केंद्र उपलब्ध आहेत त्यांची संख्याही फार कमी आहे.बेघर व्हायचे की, जीव गमवायचा?या धोकादायक इमारतीमधील रहिवाशांनी महानगरपालिका प्रशासनाकडे पर्यायी घरांची मागणी केली आहे. परंतु महानगरपालिकेने तिच्या ताब्यात पुरेशी जागा नसल्याचे कारण पुढे करून घरे देण्यास साफ नकार दिलेला आहे. त्यामुळे या रहिवाशांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली असून इमारत सोडली तर बेघर होऊ नाहीच सोडली तर जीव गमावू, अशी स्थिती आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारBuilding Collapseइमारत दुर्घटना