मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्थानकावरील प्रस्तावित कोचिंग टर्मिनसच्या उभारणीसाठी पुढच्या महिन्यात निविदा काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पाला १७ मार्च २०२५ रोजी औपचारिक मान्यता देण्यात आली होती.
रेल्वेच्या बांधकाम विभागाने जून २०२७पर्यंत या टर्मिनलचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या, अभियांत्रिकी स्केल प्लॅन अंतिम करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जवळजवळ सर्व शाखा अधिकाऱ्यांनी अभियांत्रिकी स्केल प्लॅनला मान्यता दिली आहे आणि येत्या आठवड्यात विभागीय स्तरावरून त्याची औपचारिक मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे.
सॉर्टिंग लाइन्सवर विकासवसईवरून दक्षिण भारताकडे एक्स्प्रेस चालवण्याची वाढती मागणी आणि वसई रोड-पनवेल दरम्यान मेमू/ईएमयू सेवांच्या वाढत्या मागणीमुळे लोकप्रतिनिधींकडून या ठिकाणी टर्मिनस उभारण्यासाठी रेल्वेवर सतत दबाव आणला जात होता. हे लक्षात घेता, पूर्व यार्डमध्ये असलेल्या विद्यमान सॉर्टिंग लाइन्सवर या नवीन टर्मिनलचा विकास प्रस्तावित आहे.