वसईच्या प्लास्टिक कंपनीत भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:18 IST2019-07-26T23:18:19+5:302019-07-26T23:18:31+5:30

लाखोंचा मुद्देमाल खाक : दोन - तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश

Vasai Plastics Company catches fire | वसईच्या प्लास्टिक कंपनीत भीषण आग

वसईच्या प्लास्टिक कंपनीत भीषण आग

नालासोपारा : वसई पूर्वेकडील वालीव येथील असलेल्या प्रिया नावाच्या प्लास्टिक कंपनीत भीषण आग लागली होती. या आगीत कंपनीतील लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी दोन ते तीन तास संघर्ष करावा लागला आणि आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

प्लास्टिकची बटणे बनविण्याच्या कंपनीला शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनीत आग लागल्याची माहिती स्थानिकांनी अग्निशामक दलाला दिली होती. आग इतकी तीव्र होती की धुराचे लोट एका किमी.च्या अंतरावरून दिसत होते. शुक्रवारी इंडस्ट्री परिसर बंद असल्याने जीवितहानी झाली नाही.

Web Title: Vasai Plastics Company catches fire