शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वसईत त्रिशंकू ; पं. समितीची चावी भाजपकडे, जिल्हा परिषद गटात भाजपने अर्नाळ्यात उघडले खाते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 12:17 AM

विधानसभा निवडणुकीत देदीप्यमान यश प्राप्त करणाऱ्या बहुजन विकास आघाडीला या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मात्र कमालीचे बॅकफूटवर जावे लागले आहे.

सुनील घरत पारोळ : विधानसभा निवडणुकीत देदीप्यमान यश प्राप्त करणाऱ्या बहुजन विकास आघाडीला या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मात्र कमालीचे बॅकफूटवर जावे लागले आहे. वसई पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या बविआला या वेळी मात्र केवळ ३ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे शिवसेनेनेदेखील चांगली लढत देत पं. समितीच्या ३ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपनेही स्वबळावर बविआ तसेच शिवसेनेला मजबूत टक्कर देऊन पंचायत समितीच्या २ जागांवर आपले उमेदवार निवडून आणले आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या एकूण ४ गटांपैकी २ गट बविआकडे, १ गट शिवसेनेकडे आणि १ गट भाजपने राखला. बुधवारच्या निवडणूक निकालानंतर वसई तालुक्यातील बहुजन विकास आघाडीच्या राजकीय वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. पंचायत समितीतील सत्तेसाठी बविआला भाजपची साथ घ्यावी लागणार आहे. मात्र, भाजप बविआला साथ देतो की शिवसेनेला ते पाहणे रंजक ठरणार आहे.बहुजन विकास आघाडीने झंझावाती प्रचार केला होता. मात्र, मतदारांनी बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांना नाकारले. सुरूवातीपासूनच शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांनी मताधिक्य घेऊन विजयाला गवसणी घातली. भाताणे गटात बविआच्या अरूण दामोदर पाटील यांना शिवसेना-श्रमजीवीच्या गणेश यशवंत उंबरसाडा यांनी पराभवाचा धक्का दिला. मेढे गणातून शिवसेना-श्रमजीवीच्या रूपेश वामन पाटील यांनी बविआच्या रूपेश वसंत पाटील यांना १ हजारांच्या मताधिक्याने पराभूत केले. येथे बविआला नाराज कार्यकर्त्यांचा फटका बसला, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर भाताणे गणात शिवसेनेच्या आनंद पाटील यांनी बविआच्या प्रणय कासार यांना पराभवाचा धक्का दिला. भाताणे गटात असलेली बहुजन विकास आघाडीची राजकीय ताकद पाहता तेथे शिवसेना-श्रमजीवी संघटनेने मिळवलेले यश बविआच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडते.दुसरीकडे तिल्हेर गटात शिवसेना-श्रमजीवी संघटनेचे वर्चस्व असतानाही बहुजन विकास आघाडीचे कृष्णा माळी यांना केवळ १२५ मताधिक्याने विजय मिळाला, तर श्रमजीवी संघटनेचा मातब्बर चेहरा सुरेश रेंजड यांना पराभवाचा धक्का बसला. चंद्रपाडा गणातही बविआच्या शुभांगी तुंबडा यांनी शिवसेनेला नामोहरम करत विजय संपादन केला. तसेच तिल्हेर गणात भाजप-अपक्ष उमेदवारांच्या आव्हानानंतरही शिवसेनेच्या अनुजा अजय पाटील यांनी विजय संपादन केला. त्यांनी बविआच्या दीक्षा दौलत पवार यांचा पराभव केला. वासळई गणात बविआच्या सविता पाटील यांनी तर कळंब गणात भाजपला आधीच बिनविरोध विजय मिळाला आहे. अर्नाळा किल्ला गणात भाजपच्या वनिता तांडेल तर अर्नाळा गणात बविआचे सुनिल अंकारे विजयी झाले.>पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी शिलेदारपालघर जिल्हा परिषदभाताणे - ५४ गणेश उंबरसाडा (शिवसेना )चंद्रपाडा- ५५ कृष्णा माळी (बविआ)अर्नाळा- ५६ आशा चव्हाण (भाजप )कळंब-५७ नीलिमा भोवर (बविआ) (बिनविरोध)>वसई पंचायत समितीभाताणे : १०७ आनंद पाटील (शिवसेना )मेढे : १०८ रुपेश पाटील (शिवसेना)तिल्हेर : १०९ अनुजा पाटील (शिवसेना)चंद्रपाडा : ११० शुभांगी तुंबडा (बविआ )अर्नाळा : १११ सुनील अंकारे (बविआ)अर्नाळा कि. : ११२ वनिता तांडेल (भाजप )कळंब : ११३ अनिता जाधव भाजप (बिनविरोध)वासळई : ११४ सविता पाटील (बविआ)>पंचायत समितीत भाजपचा आधारवसई पंचायत समितीच्या ८ गणांपैकी बविआ - ३, शिवसेना - ३ आणि भाजप - २ अशी स्थिती आहे. याआधी बहुजन विकास आघाडीच्या हातात सत्तेच्या चाव्या होत्या. आता मात्र बविआ आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना सत्तेसाठी भाजपचा आधार मिळणार असल्याचे चित्र दिसते आहे. मात्र, भाजप नेमके कोणाच्या सोबत जाणे पसंत करतो ते पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद