शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वसईमध्येच हवे नवीन पोलीस आयुक्तालय; तालुक्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:04 IST

पोलिसांच्या वर्चस्वाची गरज

- मंगेश कराळे नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. एकीकडे पोलीस गुटखा, दारू, रेती, ड्रग्स माफिया यांच्यावर वचक ठेवत असले तरी हत्या, मारामारी, चोरी, दरोडे, लुटमार, बलात्कार, विनयभंग, अपहरण आदी गंभीर गुन्ह्यांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. विशेषत: वसई तालुक्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मीरा-भार्इंदर-वसई विरार नवीन पोलीस आयुक्तालयाला राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. यामुळे याच भागात पोलीस आयुक्तालय असावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

राज्य सरकारने कडक शिस्तीचे आणि गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळख असलेले सदानंद दाते यांची पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक केली. त्यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. वसई तालुक्याअंतर्गत असलेले तुळिंज, विरार आणि वालीव पोलीस ठाण्यांमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत. वसई, विरार, पालघर आणि बोईसरमध्ये दररोज लोंढेच्या लोंढे येत असल्याने लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची कुमक वाढवण्यात आली, पण येथे असे काही गुन्हे समोर आले आहेत की, अन्य राज्यांची पोलीस यंत्रणा ज्या मोस्टवाँटेड गुन्हेगारांचा शोध घेत आहे, ते या पालघर जिल्ह्यातील नालासोपारा, वसई, विरार या परिसरात बिनधास्त आश्रय घेत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगारांना किंवा मोस्टवाँटेड गुन्हेगारांना लपण्यासाठी स्वस्तात घरे भाड्याने उपलब्ध होत असल्याने नालासोपारा शहर सगळ्यात सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही वर्र्षांपासून नालासोपारा शहराचे नाव गुन्हेगारी, दहशतवादी घडामोडी, नकली नोटा, बांग्लादेशी यांच्याशी जोडले गेलेले आहे. या ना त्या घटनांमुळे नालासोपारा शहराचे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. मुंबई पोलीस, क्राईम ब्रँच, एटीएस तसेच अन्य राज्यांतील पोलीस गुन्हेगार शोधण्यासाठी किंवा पकडण्यासाठी नालासोपारा शहरात अनेक वेळा आल्याचे निदर्शनास आले आहे.

आम्ही सर्व संभाव्य पर्याय शोधत आहोत. तयार परिसराची उपलब्धता बघून लवकर काम सुरू करण्यात येईल. याबाबत माहिती घेऊन लवकरच बोलू.- सदानंद दाते, पोलीस आयुक्त, मीरा-भार्इंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरार