in vasai man kills his friend after dispute police arrested him kkg | आधी किरकोळ वादातून मित्राची हत्या; मग त्याच्याच मृतदेहाजवळ रडत बसला

आधी किरकोळ वादातून मित्राची हत्या; मग त्याच्याच मृतदेहाजवळ रडत बसला

- आशिष राणे 

वसई- वसई येथे किरकोळ वादातून एका तरुणाची त्याच्याच मित्राकडून तीक्ष्ण हत्याराने छातीत सपासाप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी 2 वाजता घडली. वसीम शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी धानिष या आरोपीला माणिकपूर पोलिसांनी लगेचच अटक केली. वसीम आणि धानिष हे दोघेही मित्र होते. त्यांच्यात किरकोळ वाद झाला. याच वादातून ही हत्या झाली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला सांगितले. 

मिळालेल्या माहितीनुसार, वसीम व आरोपी धानिष हे दोघेही मित्र असून ते वसईतच राहत होते,तर आरोपी धानिषला शुक्रवारी रात्री वसीमने काही कारणावरून मारहाण करून गळ्याला पकडून खेचून नेले होते. सध्या सर्वत्र संचारबंदी असल्याने रस्त्यावर कोणीही नसते. त्याचाच फायदा घेऊन आणि आदल्या दिवशीचा राग मनात ठेवून धानिषने वसीमची तीक्ष्य चाकूने छातीवर सपासप वार करून हत्या केली. पं. दिनदयाळ नगरमध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

धानिषने चाकूने वार केल्यानंतर वसीम रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात माणिकपूर पोलीस आरोपीची चौकशी करत असून चौकशी त्यानंतरच हत्येचे नेमके कारण कळू शकेल, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.
 

Web Title: in vasai man kills his friend after dispute police arrested him kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.