शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

भरावामुळे वसई बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:09 PM

जलप्रलय नैसर्गिक नव्हता; अवैध बांधकामे, भूमाफिया हेच कारणीभूत

पारोळ : वसईतील शेकडो कोटींची मालमत्ता व चौघे बळी जाण्यास कारणीभूत ठरलेला जलप्रलय हा निसर्ग निर्मित नव्हता तर बेकायदेशीर माती भराव आणि पाणथळ जागांवरील अतिक्र मणे, भू माफिया यामुळेच वसई बुडल्याचा आरोप शिवसेनेचे पालघर उपजिल्हाप्रमुख विवेक पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला असून, बेकायदेशीर माती भराव करणाऱ्या भूमाफीयांबाबत वेळोवेळी पूर्वकल्पना देऊनही उपाय योजना न करणाºया प्रशासकीय अधिकाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन वसई-विरार नालासोपारा पाण्याखाली गेले. त्यामुळे अनेक नागरिकांचे संसारच उघड्यावर पडले. अजूनही वसईतील नागरिकांना या घटनेपासून सावरता आलेले नाही.त्याचे तीव्र पडसाद येथे उमटत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या सविस्तर निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे की, वसई पूर्वेच्या राजावली ग्रामंपचायतीच्या हद्दीत सर्व्हे नंबर १ ते १००, २७२, २७४, २८०, २८१, २६६ व ३३१ मध्ये झालेल्या बेकायदेशीर माती भरावामुळेच बºयाच ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन मोठा परिसर पाण्याखाली गेला.येथील खार जमिनीत (राजाळखार) सहारा ग्रुपने मोठ्या प्रमाणात माती भरावाचे काम केलेले असून हा भराव जवळजवळ शेतजमिनीपासून आठ ते दहा फूट उंच आहे. येथूनच सोपारा-वालीव, सातिवली मार्गे पाणी येते ते नायगाव खाडीला, अर्थात समुद्राला मिळते. पावसाळ्यात तुंगारेश्वर डोंगराचे पाणी, नालासोपारा-विरार शहरातील पाणी, गोखिवरे भागातील पाणी या सर्व ठिकाणच्या पावसाळी पाण्याचा निचरा याच सोपारा-वसई खाडीमार्गे होत असतो. पेल्हार धरण जेव्हा ओव्हर फ्लो होते त्याचे पाणी येथूनच येते. ज्या ठिकाणी भराव झालेला आहे, पूर्वी पूरपरिस्थितीतही त्या ठिकाणाहून जवळजवळ तीन मैल अंतरापर्यंत पाणी त्या शेतजमिनीवरून पसरून वाहत असे! आता फक्त सोपारा-वसई-नायगाव खाडीतूनच पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे नवघर पूर्व भागातील कारखाने आदी भाग पाण्याखाली गेला. कारण विस्तृत पाणी वहायचे बंद झाले. आधी ज्या पाण्याचा निचरा एक दिवसात व्हायचा, त्याला आता पाच दिवस लागले.त्यांनी दिलेल्या या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आम्ही दि. ६/६/२०१५ व दि. ७/७/२०१५ रोजी याबाबतीत जिल्हाधिकारी जिल्हा ठाणे व स्थानिक प्राधिकरणाला निवेदने देऊन तक्रार केली असता तहसीलदार, वसई तालुका यांनी संंबंधित ‘सहारा’ बिल्डरला बेकायदेशीर माती भराव केल्याप्रकरणी ४ कोटींची दंडात्मक नोटीस बजावली व ते काम बंद केले. पण सिडकोची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे केलेला भराव तसाच आहे. जर आम्ही आधीच दिलेल्या निवेदनानुसार शासनाने तो भराव काढून टाकला असता तर आज जी वसई पाण्यात बुडाली ती बुडाली नसती दृश्य दिसले नसते तो भराव बेकायदेशीर आहे.

दोषी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच या भागातून पाणी जाण्याचे मार्ग मोकळे करावेत, याची चौकशी करु न दोषींविरोधात गुन्हे दाखल करावेत. नागरिकांची भविष्यात होणाºया माती भरावाच्या धोक्यापासून मुक्तता करावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. ​​​​​​​‘वसई का बुडाली’; आज होणार परिसंवाद ...वसई प्रतिनिधी : अतिवृष्टीच्या काळात वसई विरार शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले होते, या तालुक्याची वाताहात का झाली,याची नेमकी कोणती कारणे आहेत ती शोधायला हवीत. या पार्श्वभूमीवर ‘वसई का बुडाली’ या विषयांवर पर्यावरण संवर्धन समितीतर्फे रविवारी दि. २२ जुलै सायंकाळी ५ वाजता माणिकपूर येथील समाज उन्नती मंडळ सभागृहात परिसंवाद होणार आहे.या परिसंवादात जेष्ठ साहित्यिक व हरित वसईसाठी लढा देणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो ,नगररचनाकार आणि माजी मंत्री चंद्रशेखर प्रभू मार्गदर्शन करतील. तसेच या परिसंवादासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांचीही उपस्थिती लाभणार असल्याची माहिती पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस