वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचे विविध उपक्रम

By धीरज परब | Published: October 2, 2022 04:43 PM2022-10-02T16:43:05+5:302022-10-02T16:43:31+5:30

Police News: मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाला १ ऑक्टोबर रोजी २ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मीरा भाईंदर शहरात पोलिसांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Various police activities in Mira Bhayander on the occasion of second anniversary of Vasai Virar Police Commissionerate | वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचे विविध उपक्रम

वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचे विविध उपक्रम

googlenewsNext

- धीरज परब 
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाला १ ऑक्टोबर रोजी २ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मीरा भाईंदर शहरात पोलिसांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी यंदा २ रा वर्धापन दिवस १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणार आहे . नया नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते . सुमारे सव्वा दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले . तसेच नाशामुक्ती शिबीर चे आयोजन केले होते . ५ रोजी शाळा व महाविद्यालयांना पोलीस भेटी देणार असून ७ ऑक्टोबर रोजी पोलीस संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत लांगी यांनी गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादींना परत केला तसेच शाळा व महाविद्यालयात जाऊन त्यांना मार्गदर्शन केले . ४ ऑक्टोबर रोजी पोलीस व कुटुंबीयांची आरोग्य तपासणी व सागरी सुरक्षे बाबत मार्गदर्शन शिबीर होणार आहे.

मीरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह बागल यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने शनिवारी पोलीस व कुटुंबियांची आरोग्य तपासणी केली .  पोलीस मित्रांचा सत्कार करण्यात आला . ३ ऑक्टबर सोमवारी महिलां विषयक कायदे मार्गदर्शन व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षे बद्दल जनजागृती केली जाणार आहे . 

Web Title: Various police activities in Mira Bhayander on the occasion of second anniversary of Vasai Virar Police Commissionerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.