शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

झडपोलीची मल्ल मनाली होते आहे टोकियो ऑलिंपिकसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:43 AM

- हितेंन नाईक पालघर : जिल्हा, राज्य स्पर्धांबरोबरच अनेक स्पर्धा गाजवीत जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्था, झडपोलीची कन्या मनाली जाधव ...

- हितेंन नाईकपालघर : जिल्हा, राज्य स्पर्धांबरोबरच अनेक स्पर्धा गाजवीत जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्था, झडपोलीची कन्या मनाली जाधव ही कुस्तीपटू सध्या गोवा येथे होणाऱ्या नॅशनल गेम साठी जोरदार सराव करीत असून टोकियो येथे २०२० मध्ये होणाºया आॅलम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे.भिवंडी च्या दुगाड फाटा येथील शालेय जीवनात खोखो सह अन्य खेळात तरबेज असलेल्या मनाली ची कुस्तीसाठी असलेली शरीरयष्टी पाहता शिक्षकांनी तिला कुस्तीकडे वळण्याचा सल्ला दिला. आईही शालेय जीवनात एक चांगली खेळाडू असल्याने तिने होकार दर्शविला आणि ८ वी पासून कुस्तीपटूचा तिचा प्रवास सुरू झाला. नवसमाज विद्यामंदिर, मानिवली (भिवंडी) येथून पुढे तिने कुस्तीच्या चांगल्या प्रशिक्षणासाठी तिने पुणे गाठले. १२ वी पर्यंतचा अभ्यास करून आंतरराष्ट्रीय कुस्ती मधील पंच असलेल्या दिनेश गुंड सरांच्या मार्गदर्शनाखाली ती नवनवीन बारकावे शिकू लागली. ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी मधून प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धेत आपला ठसा उमटविल्या नंतर यवतमाळ येथे झालेल्या १९ वर्षीय ६७ किलोच्या स्पर्धेत तिने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. नंतर गुजरात मधील सुरत येथे झालेल्या राजीव गांधी खेळ अभियान स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळविले. तर जम्मू काश्मीर येथे झालेल्या सब ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत तिने चांगलीच छाप पाडली.चांगली कुस्तीपटू होण्याचे आई वडिलांच स्वप्न उराशी बाळगून ती आपली वाटचाल करीत असतांना तिला स्पर्धेत अपघात झाला आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बनण्याचे स्वप्न भंग पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. तिच्या पायावर कराव्या लागणाºया शस्त्रक्रियेसाठी लागणाºया मोठ्या खर्चाचे ओझे एक साध्या पतपेढीत कामाला असणाºया तिच्या आईला शक्य नव्हते. मनाली सोबत असणाºया अन्य दोन मुलींच्या शिक्षणाचा खर्च ही डोक्यावर होता. अशावेळी झडपोली (विक्रमगड) येथील जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांना हे समजताच त्यांनी मनालीच्या आईची भेट घेत तिचे पालकत्वच स्विकारले. तिच्या शास्त्रक्रिये बरोबरच तिच्या महागड्या आहाराचा, स्पर्धेतील साहित्याचा सर्व खर्च सध्या सांबरे स्वत: करीत आहेत.सध्या मनाली सोबत तिची लहान बहीण गौरी ही वारजे (पुणे) येथील नामांकित सह्याद्री तालमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. मनाली व गौरी जाधव आज जिजाऊ स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या आयकॉन खेळाडू म्हणून खेळत आहे. आत्ताच झालेल्या महाराष्ट्र झी दंगल या स्पर्धेत सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने आपली चमक दाखवून दिली. ठाणे महापौर कुस्ती स्पर्धेत ६८ किलो वजनी गटात प्रथम क्र मांक तर तिची बहिण गौरी जाधवने ६२ किलो वजनी गटात प्रथम क्र मांक मिळवला आहे. सध्या मनाली २०१९ मध्ये होणाºया सिनिअर नॅशनल स्पर्धेची जोरदार तयारी करीत असून ही स्पर्धा जिंकून इंडिया कॅम्प सहभाग,आशिया ट्रायल स्पर्धेत विजयी होत थेट २०२० मध्ये टोकियो येथे होणाºया आॅलम्पिक मध्ये सुवर्णपदकला गवसणी घालण्यासाठी  मनाली विजय वराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या कसून सराव करीत आहे.माझ्या अपघातानंतर माझी कारकीर्द संपुष्टात आल्याच्या भीतीने मी ग्रासले असताना निलेश सांबरेंनी "तू फक्त लढ" ह्या प्रेरणेने मी आज आॅलिम्पक पदक जिंकण्याचे स्वप्न पाहू शकली.- मनाली जाधव,राज्यस्तरीय कुस्तीपटू.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार