शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच करा घरे रिकामी; पुन्हा आली पालिकेची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 10:44 IST

तिसऱ्या मुंबईतील ३००० कुटुंबे १४ वर्षांनंतर होणार बेघर : दिलासा नाहीच

- मंगेश कराळेलोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसई-विरारला अनधिकृत इमारतीच्या बांधकामांनी जणू गालबोटच लागले असल्याचे दिसून येत आहे. उच्च न्यायालयाच्या इमारती पाडण्याच्या आदेशानंतर येथील ३००० कुटुंबे १४ वर्षांनंतर  बेघर होण्याची चिन्हे आहेत.  रहिवासी घरे वाचविण्यासाठी अनेक ठिकाणी धाव घेत असले तरी त्यांना दिलासा मिळत नसल्याचे दिसत आहे. आयुक्त अनिलकुमार पवार यांनी ३० सप्टेंबरपर्यंत कारवाईला बंदी घातली होती. आता मनपाने त्यांना लवकरात लवकर घर रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.

सध्या भाड्याने राहणाऱ्या लोकांनी स्थलांतर सुरु केले आहे. मात्र, स्वत:च्या घरात राहणारे घाबरले आहेत. महापालिकेने वीज विभागाला पत्र देऊन दोन दिवसांत इमारतींचा वीज, पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असे सांगितले आहे. 

२०१० ते १२ पर्यंत येथे प्रत्येकी चार मजल्यांच्या ४१ इमारती उभारण्यात आल्या. सर्व फ्लॅट विकले. काही वर्षांपूर्वी अजयने त्याच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याची तक्रार केली होती, मात्र त्यावर कारवाई झाली नाही. यानंतर जमीन मालकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतर सीताराम, अरुण यांच्यावर गुन्हा दाखल करून दोघांना तुरुंगात टाकण्यात आले. हायकोर्टाने मनपाला सर्व इमारती पाडण्याचे आदेशही दिले. 

न्यायालयाने मनपाकडून नोव्हेंबरपर्यंत कारवाईचा अहवाल मागवला आहे. पावसाळ्यापूर्वी येथे राहणाऱ्या सुमारे तीन हजार सदनिकाधारकांना मनपाने नोटिसा देण्यास सुरुवात केली. यामुळे लोक घाबरू लागले. घर वाचवण्यासाठी रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही गेले, मात्र त्यांना सगळीकडून केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. 

पावसाळ्यात कोणालाही बेघर केले जाणार नाही, असे महापालिका आयुक्तांनी सांगितले होते. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासनही देण्यात आले होते. आता मनपाने सर्व फ्लॅट लवकरात लवकर रिकामे करावेत, असा सूचना फलक लावला आहे. येथे पुन्हा नोटीस देण्याचे काम सुरू झाल्याचे महानगरपालिकेच्या ‘डी’ प्रभागाचे सहायक आयुक्त मोहन संखे यांनी सांगितले.