महामार्गावर अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; भरधाव वेगातील हायवा ट्रकने दिली धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 19:35 IST2024-08-18T19:33:42+5:302024-08-18T19:35:05+5:30
मरण पावलेल्या दोन्ही पती पत्नीची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी लोकमतला सांगितले आहे.

महामार्गावर अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; भरधाव वेगातील हायवा ट्रकने दिली धडक
नालासोपारा (मंगेश कराळे) - मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर दुचाकीला भरधाव वेगातील हायवा ट्रकने ठोकल्यामूळे हा अपघात घडला आहे.
हा अपघात घडल्यावर आरोपी ट्रक चालक पसार झाला असून पेल्हार पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. मरण पावलेल्या दोन्ही पती पत्नीची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी लोकमतला सांगितले आहे.