बेशुद्ध दिव्याची करुण कहाणी, नातेवाईकांनी लावला बळजबरी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 03:21 AM2017-08-20T03:21:03+5:302017-08-20T03:21:03+5:30

मुंबईकडे जाणा-या सौराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये एक तरुणी बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तिच्यावर उपचार करून व तिला तिच्या आईच्या स्वाधीन केले.

 Unconscious candle story, forced marriage coupled with relatives | बेशुद्ध दिव्याची करुण कहाणी, नातेवाईकांनी लावला बळजबरी विवाह

बेशुद्ध दिव्याची करुण कहाणी, नातेवाईकांनी लावला बळजबरी विवाह

Next

पालघर : मुंबईकडे जाणा-या सौराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये एक तरुणी बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तिच्यावर उपचार करून व तिला तिच्या आईच्या स्वाधीन केले.
या स्टेशनवर शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता आलेल्या सौराष्ट्र एक्स्प्रेसच्या डब्यात एक तरुणी बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती स्टेशन अधिक्षक भाटी यांना दिली.
त्यानुसार वरिष्ठ रेल्वे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर ह्यांनी सहा. पो. उपनिरीक्षक अरु ण बनसोडे, पोलीस नाईक सुभाष राजड, पो.ना. शंकर आसणे, महिला पोलीस बाचकर यांना पाठविले. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या तरुणीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
उपचाराअंती शुद्धीवर आल्यानंतर आपले लग्न आपल्या नातेवाईकांनी जबरदस्तीने लावून दिल्याची माहिती तिने दिल्यानंतर त्यांनी लिंबायत पोलीस स्थानकातील वरिष्ठांना ह्याची माहिती कळवून
तिची आई आदशा मिश्रा ह्यांना पालघर मध्ये बोलावून त्या मुलीला तिच्या ताब्यात दिल्याची माहिती तपास अधिकारी बनसोडे ह्यांनी दिली.

लग्न मनाविरुद्ध अन् सासरच्यांचा त्रास
उपचारानंतर तिने आपले नाव दिव्या अनिल ओझा असून आपण मूळ उत्तरप्रदेश च्या रहिवासी असल्याचे सांगितले. आपल्या मनाविरु द्ध आपले लग्न सुरत येथे लावून देण्यात आले.मला सासरी मानसिक त्रास होत असल्याने आपण घरातून निघून गेलो अशी माहिती तिने पोलिसांना दिली त्यामुळे पोलिसांनी तिच्या माहेरची माहिती तिच्याकडून मिळवून तिच्या आईशी संपर्क साधला. आता हा विवाह कुणी लावला आणि कशासाठी लावला याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यानंतरच या प्रकरणामधील गूढ उकलले जाऊ शकेल.

Web Title:  Unconscious candle story, forced marriage coupled with relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.