खाते उघडणाऱ्या ग्राहकाला असभ्य वागणूक

By Admin | Updated: May 14, 2017 22:42 IST2017-05-14T22:42:22+5:302017-05-14T22:42:22+5:30

बँकेत खाती नसलेल्या भारताच्या प्रत्येक नागरिकाला बँकेच्या व्यवहारात सामावून घेण्यासाठी व त्यांना बँकेच्या प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

Unclear behavior by the customer who opens the account | खाते उघडणाऱ्या ग्राहकाला असभ्य वागणूक

खाते उघडणाऱ्या ग्राहकाला असभ्य वागणूक

हितेन नाईक  
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : बँकेत खाती नसलेल्या भारताच्या प्रत्येक नागरिकाला बँकेच्या व्यवहारात सामावून घेण्यासाठी व त्यांना बँकेच्या प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच मोठ्या प्रमाणात अशी खाती उघडण्यासंदर्भात निर्देश दिलेले असताना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा बँक आॅफ इंडिया शाखेमार्फत या नियमांची पायमल्ली केल्याचे निदर्शनास आले आहे.
मोखाडा येथील बँक आॅफ इंडियाच्या वाकडपाडा शाखेत संयुक्त खाते काढण्यासाठी गेलेल्या हरिश्चंद्र शिंदे याना बँक कर्मचाऱ्यांनी खाते उघडण्यास नकार दिला आहे. खाते न उघडण्यासंदर्भात शिंदे यांनी जाब विचारला असता बँकेमार्फत कोणतेही उत्तर मिळाले नाही. याउलट बँक कर्मचारी रोखपाल (कॅशियर) कोमल निकम यांनी ‘आम्ही नाही खाते उघडून देत जा, तुला काय करायचे ते कर’ अशा असभ्य भाषेमध्ये उर्मट वागणूक दिली. वाकडपाडा शाखेपासून ४ किलोमीटर लांब किनिस्ते येथे राहणारे शिंदे हे शाळेतून विद्यार्थ्यांचे असे खाते गरजेचे असतांना आपल्या पाल्याचे व स्वत:चे असे खाते उघडण्यासंदर्भात या शाखेत आले होते.
खाते उघडण्याविषयी त्यांनी बँक मॅनेजरकडे विचारणा केली असता अगोदरच अशी खाती उघडण्यासाठी आमच्याकडे भरपूर अर्ज असल्याचे कारण सांगत मॅनेजरनी त्यांचा अर्ज धुडकावून लावला व तदनंतर या प्रकरणाशी काहीही संबंध नसलेले कॅशियर निकम यांनी पुढे येत सदर खाते उघडण्यास स्पष्ट नकार दिला. घडलेली ही घटना अपमानास्पद होती व त्यांच्यासोबत झालेली हि घटना इतर ग्राहकांसोबत होऊ नये यासाठी तात्काळ त्यांनी ही हकीकत लोकमतकडे बोलून दाखवली. बँक कर्मचाऱ्यांनी शिंदेंशी केलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल त्या बँक कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई होण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.

Web Title: Unclear behavior by the customer who opens the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.