शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

उद्धवसाहेब, वाढवण बंदराबाबत स्थानिकांना दिलेला शब्द पाळा; स्थानिकांचा आर्त टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 00:28 IST

उद्ध्वस्त होणारी गावे वाचवण्यासाठी लढा

हितेन नाईक

पालघर : वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असेल तर शिवसेना पूर्ण ताकदीनिशी तुमच्यासोबत राहील, असे पालघरमध्ये जाहीर वक्तव्य करून स्थानिकांचे मनोधैर्य वाढविणारे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्थानिकांचा बंदराला दिवसेंदिवस विरोध वाढत असतानासुद्धा अजून गप्प का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, उद्ध्वस्त होणारी गावे वाचविण्यासाठी लढा उभारणाऱ्या स्थानिकांवर पोलिसांच्या दबावतंत्राचा वापर सुरू करण्यात आला आहे.

केंद्राने वाढवण बंदराला लागणारी पर्यावरण विभागाची परवानगी मिळवीत बंदर उभारणीची जाहीररीत्या घोषणा केली असताना वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि स्थानिकांनी मागील ३-४ महिन्यांपासून आपले लढे सुरू ठेवले आहेत. त्यामुळे वाढवणच्या भूमीत एक फावडे मारण्याची हिंमत अजून जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना झाली नसून वाढवण बंदरविरोधी लढ्याने आता व्यापक स्वरूप प्राप्त केले आहे. 

महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, सीपीएमचे आमदार विनोद निकोले, आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संस्था आदी संघटना स्थानिकांच्या लढ्यात सहभागी झाल्या आहेत.मागच्या अनेक निवडणुकांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदर स्थानिकांना नको असेल तर शिवसेना ते कदापि होऊ देणार नाही, असा विश्वास इथल्या स्थानिकांना दिला होता. त्यामुळे पालघर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना इथल्या मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. त्यामुळे आता याची परतफेड करायची पाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची असून ते आता राज्याचे मुख्यमंत्री असल्याने प्रथम त्यांनी वाढवण गावात घुसवलेल्या पोलिसांना माघारी बोलाविण्याचे आदेश द्यायला हवेत. 

निवडणूक काळात ४-४ दिवस पालघरमध्ये तळ ठोकून राहणारे मंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांना शिवसेनेच्या ताकदीसोबत वाढवणवासीयांच्या मदतीला तत्काळ पाठविण्याचे आदेश द्यायला हवेत, अशी माफक अपेक्षा शिवसेनेशी एकनिष्ठ राहणारा मतदार करीत आहे.

गावात पोलीस शिरलेत, आम्हाला भीती वाटते!वाढवणवासीयांनी उभारलेल्या विरोधाला बळ मिळू नये यासाठी किनारपट्टीवरील पोलीस ठाण्यातून स्थानिक तरुण आणि पदाधिकाऱ्यांच्या ज्या चौकशा सुरू करण्यात आल्या आहेत, त्या तत्काळ थांबविण्याचे आदेशही जारी करायला हवेत, अशा मागण्या करण्यात येत आहेत. त्याचबरोबर, ‘साहेब, गावात पोलीस शिरलेत, आम्हाला भीती वाटते !’ अशी आर्त हाक शाळकरी मुले मारतानाचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना