शहरं
Join us  
Trending Stories
1
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
4
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
5
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
6
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
7
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
8
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
9
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
10
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
11
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
12
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
13
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
14
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
15
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
16
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
17
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान
18
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
19
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! उरलेला चहा पुन्हा गरम करून पिता? आताच बदला सवय, अन्यथा...
20
"प्रत्येक सनातनीला माझा संदेश...", राकेश किशोर यांच्याजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली

वाड्यातील आश्रमशाळेच्या दोन विद्यार्थ्यांचा गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 07:00 IST

मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित; आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क वाडा : तालुक्यातील आंबिस्ते येथील कै. दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांनी बुधवारी मध्यरात्री झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. देविदास परशुराम नवले (१५) व मनोज सीताराम वड (१४) विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघे अनुक्रमे दहावी व नववीत शिकत असून, मोखाडा तालुक्यातील बिवळपाडा व दापटी येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी मुख्याध्यापक दत्तात्रेय दाते, अधीक्षक राजू सावकारे यांना निलंबित केल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त भरत सावंत यांनी दिली.

आंबिस्ते येथे कै. दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे. येथे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग असून, सुमारे ४५० विद्यार्थी येथे निवासी शिक्षण घेत आहेत. बुधवारी रात्रीचे जेवण झाल्यावर सर्व विद्यार्थी झोपले. नेहमीप्रमाणे मध्यरात्रीच्या सुमारास सुरक्षारक्षक शाळेच्या मागच्या बाजूला गस्त घालत असताना त्यांना झाडाला काहीतरी लटकत असल्याचे दिसले. ते झाडाच्या जवळ गेले असता दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षारक्षकांनी तत्काळ मुख्याध्यापक, अधीक्षक व इतर शिक्षकांना आत्महत्येची माहिती दिली. काही वेळात पोलिसही तेथे दाखल झाले. पंचनामा करून विद्यार्थ्यांचे मृतदेह वाडा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे करीत आहेत.

दोषींवर कारवाई हाेईलजव्हार आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी डाॅ. अपूर्वा बासुर, पालघरचे अपर पोलिस अधीक्षक विनायक नरले व पोलिस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. खासदार डाॅ. हेमंत सवरा व भाजपचे नेते प्रकाश निकम यांनीही दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

संस्थेचे अध्यक्ष जबाबदारसंस्थेचे आश्रमशाळेकडे दुर्लक्ष असून, या आश्रमशाळेला साधे तारेचे कंपाऊंड असून, तेही अनेक ठिकाणी तुटलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी रात्री १० ते ११ वाजेपर्यंत येथून गेलेल्या रस्त्यावर असतात, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव हे जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा.गोविंद पाटील, उद्धवसेना

English
हिंदी सारांश
Web Title : Two Ashram School Students Commit Suicide by Hanging in Wada

Web Summary : Two students from a Wada Ashram school were found hanging from a tree. The deceased, students of tenth and ninth grade, were residents of Mokhada. The school's principal and superintendent have been suspended pending investigation. Authorities are investigating the incident.
टॅग्स :Schoolशाळा