विरारहून सुटणा-या विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये दोन विक्रेत्यांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 05:53 IST2017-10-27T05:53:08+5:302017-10-27T05:53:11+5:30

वसई : विरारहून सुटणा-या विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये दोन विक्रेत्यांमध्ये हाणामारी झाली.

Two sellers in Virar-Dahanu passenger leaving Virar | विरारहून सुटणा-या विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये दोन विक्रेत्यांमध्ये हाणामारी

विरारहून सुटणा-या विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये दोन विक्रेत्यांमध्ये हाणामारी

वसई : विरारहून सुटणा-या विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये दोन विक्रेत्यांमध्ये हाणामारी झाली. यात एक जखमी झाला असून या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
विरारहून डहाणूला रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी जाणाºया गाडीमध्ये उदय सिंग आणि चौरसिया या दोन भाजी विक्रेत्यांमध्ये हाणामारी झाली. या वेळी प्रवाशांनी मध्यस्थी करून मारामारी थांबवण्याचा प्रयत्नही केला. यात उदय सिंग जखमी झाला आहे. दोघेही केळवे येथील रहिवासी असून वैयक्तिक वादातून त्यांच्यात हाणामारी झाली. दरम्यान, या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी रेल्वे डब्यात मारामारी केल्याप्रकरणी उदय सिंग आणि खतरू चौरसिया या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two sellers in Virar-Dahanu passenger leaving Virar