दोन दिवस आधीच नववर्षाचा जल्लोष, बुकिंग झाले हाउसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:58 AM2019-12-28T00:58:51+5:302019-12-28T00:58:57+5:30

रिसॉर्ट, हॉटेल्स : बुकिंग झाले हाउसफुल्ल

Two days before the New Year, the whole house was booked | दोन दिवस आधीच नववर्षाचा जल्लोष, बुकिंग झाले हाउसफुल्ल

दोन दिवस आधीच नववर्षाचा जल्लोष, बुकिंग झाले हाउसफुल्ल

Next

पारोळ : मंगळवारी २०१९ हे वर्ष सरून नव्या २०२० या नव्या वर्षाला प्रारंभ होणार आहे. मात्र वर्षाची समाप्ती ही मंगळवारी होणार असल्याने नागरिकांनी दोन दिवस आधीच म्हणजेच रविवारी नववर्षाचा जल्लोष साजरा करण्याचे जंगी बेत आखले आहेत. सोमवार, मंगळवार शुद्ध शाकाहारी खाण्याचे दिवस असल्याने या दिवशी जल्लोष साजरा करणे पट्टीच्या खवय्यांना शक्य होणार नाही. त्यासाठी नववर्षाचा जल्लोष डी.जे.च्या ढिनचॅक तालावर, फेसाळत्या समुद्रासोबत फेसाळलेल्या पेगबरोबर आणि तंदुरी-चिकन, मटण, मच्छीवर ताव मारत साजरा करण्याचे बेत आधीपासूनच आखले गेले आहेत. वसई हा नववर्ष जल्लोष साजरा करण्याचा महत्त्वाचा आकर्षण बिंदू असल्याने मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील नागरिकांनी महिनाभर आधीच वसईच्या पर्यटन स्थळांना पसंती देत आगाऊ बुकिंग करू ठेवली आहे. सुमारे १० दिवस आधीच वसईतील सर्व हॉटेल, रेसॉर्ट, ढाबे, अतिथीगृहे हाऊसफुल्ल झाली असून येत्या रविवारीच नववर्षाचा जल्लोष साजरा होणार आहे.

चौथा शनिवार आणि पुढील रविवार असे दोन सुट्टीचे दिवस आल्याने जल्लोष साजरा करण्यासाठी आसुसलेल्या नागरिकांसाठी दुग्धशर्करा योगच जुळून आला आहे. त्यासाठी खास वसईतील नागरिकांना वसईबाहेर दोन दिवसाची आगाऊ बुकिंग करून जल्लोषाची तयारी चालू केली आहे. तर बाहेरून येणाऱ्या नागरिकांनीदेखील वसईतील हॉटेल, रिसॉर्ट, ढाबे, अतिथीगृहे या ठिकाणी दोन दिवसांचे आगाऊ बुकिंग करून ठेवले आहे. जल्लोष म्हटला म्हणजे खास बेत आले. त्यात विविध ब्रॅण्डची दारू, चिकन, मटण, मच्छी यांना मोठी मागणी आहे. यंदाही नागरिक सोमवार किंवा मंगळवारी जल्लोषाचा बेत आखणार नाहीत, त्यासाठी रविवारचाच प्लॅन आखला जाईल याचे अंदाज असल्याने बकºया, कोंबडे, मच्छी यांची आवक आधीच तैनात करण्याचे काम संबंधितांकडून सुरू झाले आहेत. सध्या देशात आर्थिक मंदीचे वारे आहेत. साहजिकच नववर्ष जल्लोष करताना खवय्यांना खिशाला कातर लावावी लागणार आहे.

पोलीस प्रशासन सज्ज
वसई तालुक्याची पश्चिम किनारपट्टी संवेदनशील आहे. मुंबईवरील ११ वर्षापूर्वीचा दहशतवादी हल्ला पाहता दरवर्षी नववर्ष जल्लोषाला सागरी पोलीस ठाणी व नौदल तटरक्षक दल बंदोबस्तासाठी सज्ज होते. यंदा नववर्ष जल्लोषाला गालबोट लागू नये म्हणून पोलीस दले सज्ज झाली आहेत.

बनावट दारूवर नजर...

नववर्ष जल्लोष म्हटला की, बनावट दारूचा शिरकाव पालघर जिल्ह्यात व या जिल्ह्यामार्गे मुंबई, ठाणे परिसरात मोठ्या पटीने वाढतो. दमणमिश्रित दारूला अटकाव घालण्यासाठी पालघर गुजरात सीमेवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि त्यांच्या दिमतीला पोलिसांचा बंदोबस्त लागणार आहे.

जल्लोष करा, पण जपून
नववर्ष जल्लोषाला काहीच पारावर उरत नाही. अशा वेळी जल्लोष, आनंद जरूर साजरा करा, परंतु दुसºया बाजूने कायदा-सुव्यवस्था राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. दारू पिऊन वाहने चालवणे टाळलेच पाहिजे. हुल्लडबाजी, अतिमद्यसेवन टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Two days before the New Year, the whole house was booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.