तुंगारेश्वर मंदिरात अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 03:37 IST2020-02-22T03:37:10+5:302020-02-22T03:37:29+5:30

शुक्रवारी सकाळपासून या परिसरात भाविकांची गर्दी झाली होती

Tungareshwar temples a young girl who stabbed her in the temple | तुंगारेश्वर मंदिरात अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास चोपले

तुंगारेश्वर मंदिरात अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास चोपले

विरार : वसईच्या तुंगारेश्वर मंदिरात १० वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची घटना शुक्रवारी घडली. या वेळी मंदिरातील लोकांनी तरूणाला वालीव पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. वसईतील तुंगारेश्वर मंदिर हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराच्या दर्शनासाठी मुंबई-ठाण्यासह विविध परिसरातील भक्तांची अलोट गर्दी जमते.

शुक्रवारी सकाळपासून या परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. या वेळी तरूणाने मुलीची छेड काढली. सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही बाब मंदिर परिसरात असलेल्या इतर भाविकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्याची धिंड काढून त्याला वालीव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेने शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Tungareshwar temples a young girl who stabbed her in the temple