सेंट जॉन कॉलेज जवळ ट्रक,टेम्पो आणि दोन मोटरसायकलची धडक; सहाजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 20:33 IST2020-02-15T20:33:00+5:302020-02-15T20:33:11+5:30
पालघर-मनोर महामार्ग रस्त्यावरील नंडोरे नाका ह्या भागात अपघाताच्या अनेक घटना घडू लागल्या असून अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सेंट जॉन कॉलेज जवळ ट्रक,टेम्पो आणि दोन मोटरसायकलची धडक; सहाजण जखमी
पालघर-मनोर रस्त्यावरील सेंट जॉन कॉलेज जवळ एक ट्रक,टेम्पो आणि दोन मोटरसायकल ह्या मध्ये झालेल्या अपघातात सहा लोकं जखमी झाले असून त्यातील दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पालघर-मनोर महामार्ग रस्त्यावरील नंडोरे नाका ह्या भागात अपघाताच्या अनेक घटना घडू लागल्या असून अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. ह्या रस्त्यावर रिक्षा आणि काही अवजड वाहनांची होणारी बेकायदेशीर पार्किंग मुळे अपघात घडताहेत.आज संध्याकाळी एक ट्रक,टेम्पो आणि त्या पाठोपाठ आलेल्या रिक्षांच्या अपघातात एकूण सहलोक जखमी झाले आहेत.ह्या अपघातात मोहम्मद तालिब,मंतेश बेहरजी, विजय पाटील आणि मुन्ना विश्वकर्मा ह्या चार जणांना पालघर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य जखमींना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ह्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.