सुत्रकारमध्ये आदिवासी महिलेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:50 IST2018-03-27T23:50:15+5:302018-03-27T23:50:15+5:30

सोमवारी रात्री तालुक्यातील सुत्रकार येथे लग्न कार्यक्र मात साठ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे.

Tribal woman murdered in Suitkar | सुत्रकारमध्ये आदिवासी महिलेची हत्या

सुत्रकारमध्ये आदिवासी महिलेची हत्या

तलासरी : सोमवारी रात्री तालुक्यातील सुत्रकार येथे लग्न कार्यक्र मात साठ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. यानंतर मंगळवारी सकाळी आरोपी तलासरी पोलिस स्टेशनला हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली
मंगळवारी सकाळी सुत्रकार गोवरशेत येथे जिल्हा परिषद शाळेजवळ रस्त्यालगत गावातील काटीलपाडा येथील लखमी महाद्या धोदडे (६०) वर्षे या आदिवासी महिलेचा दगडाने ठेचून हत्या केलेला मृतदेह आढळून आला. या बाबत गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली यावेळी गावातील लक्षी खरपडे रा. सुत्रकार गोवरशेत, याने तलासरी पोलीस स्टेशनला हजर होऊन सोमवारी रात्री गावातील लग्न समारंभात मयत महिलेशी वाद झाल्याने तिला मी मारहाण केल्याचे सांगितले.
मयत महिला लग्न समारंभात आली होती. रात्र उशीर झाल्याने ती आपल्या घरी न जाता लग्न समारंभा जवळच्या जिल्हा परीषद शाळेच्या ओट्यावर झोपली होती. रात्री एक दीड वाजेच्या सुमारास आरोपी हा ही शाळेच्या ओट्यावर गेला तेथे झोपलेली महिला बघून त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्यास प्रतिकार केल्याने आरोपीने तीस मारहाण करून दगडाने ठेचूनतिची हत्या केली व मृतदेह फरफटत नेऊन रस्त्यावर टाकला.
पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली असता मृतदेह शाळेच्या आवारातून फरफटत शेतातून रस्स्यावर नेल्याच्या खुणा पहावयास मिळाल्या. या बाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे.

Web Title: Tribal woman murdered in Suitkar