"वादळग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे संथगतीने, निष्क्रिय वसई तहसीलदारांची बदली करा", वडेट्टीवारांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 04:20 PM2021-05-24T16:20:56+5:302021-05-24T16:24:35+5:30

Vasai News : पालघर, तालुका वसई येथील वसईच्या पश्‍चिम किनार्‍याकडील हरीत पट्ट्यातील शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

Transfer Vasai Tehsildar says maharashtra congress sameer vartak | "वादळग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे संथगतीने, निष्क्रिय वसई तहसीलदारांची बदली करा", वडेट्टीवारांकडे तक्रार

"वादळग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे संथगतीने, निष्क्रिय वसई तहसीलदारांची बदली करा", वडेट्टीवारांकडे तक्रार

googlenewsNext

आशिष राणे 

वसई - मागील आठवड्यात झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे वसई पश्‍चिम किनारपट्टीवरील शेतकरी, बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी, बागायतदारांचे नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाकडून संथगतीने सुरू आहेत. संथगतीने सुरू असलेल्या वादळग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याकडे तालुका प्रशासन प्रमुख म्हणून तहसीलदार उज्ज्वला भगत यांचे दुर्लक्ष होत असून निष्क्रिय तहसीलदार उज्ज्वला भगत यांची तत्काळ बदली करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांनी राज्याचे आपत्ती, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केल्याची माहिती लोकमतशी बोलताना दिली आहे. 

दरम्यान याबाबत माहिती देताना, जिल्हा पालघर, तालुका वसई येथील वसईच्या पश्‍चिम किनार्‍याकडील हरीत पट्ट्यातील शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा फटका वसईच्या किनार्‍यालगतच्या गावागावात, घराघरात बसलेला आहे. वसईकरांना शासकीय दिलासा मिळणे अपेक्षित आहे. तर या सर्वांमध्ये तालुका प्रशासन प्रमुख तहसीलदार उज्ज्वला भगत यांचे वसईच्या पश्‍चिम किनार्‍यालगतच्या गावातील वादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

वसईतील गावागावात, घराघरात नुकसानीचे पंचनामे होत नसल्याबद्दल यावेळी समीर वर्तक यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. अर्थातच मनमानी, बेफिकीर कार्यपद्धती असलेल्या तहसीलदार वसई यांची पंचनाम्याच्या प्रक्रियेच्या बाबतीत दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेवरून तातडीने वसईतून बदली करण्याची मागणी समीर वर्तक यांनी पालघर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आपत्ती, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. वसई तालुक्यात चक्रीवादळाने ज्या लोकांच्या घरांचे नुकसान, पडझड, किंवा शेती बागायतीचे काही नुकसान झाले असेल त्यांचे महसूलव कृषी  विभागाकडून तात्काळ तलाठी व मंडळ अधिकारी  हे सखोल चौकशी करून पंचनामे करत आहेत.

माझ्याकडे आजवर पंचनामा बाबतीत एकही तक्रार आलेली नाही तर तालुक्यातील एकही नुकसान ग्रस्त घटक वंचित राहणार नाही. याउलट शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार मदत दिली जाईल यावर माझा जास्त फोकस असेल. त्यामुळे माझ्या बदलीची व निष्क्रियतेची तक्रार जर कोणी करीत असेल तर याबाबत मी काय अधिक बोलणार शेवटी माझे कामच बोलेल.

- उज्वला भगत, वसई तहसीलदार
 

Web Title: Transfer Vasai Tehsildar says maharashtra congress sameer vartak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.