भुईगाव निर्मळ रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी; पालिका अग्निशमन दलाच्या जवानांचे दिवसरात्र मदतकार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 06:41 PM2020-08-04T18:41:25+5:302020-08-04T18:42:35+5:30

परंतु कुठं ही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती वसई विरार महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांनी लोकमत ला दिली.

Traffic jam on Bhuigaon Nirmal road for some time | भुईगाव निर्मळ रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी; पालिका अग्निशमन दलाच्या जवानांचे दिवसरात्र मदतकार्य

भुईगाव निर्मळ रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी; पालिका अग्निशमन दलाच्या जवानांचे दिवसरात्र मदतकार्य

googlenewsNext

वसई :- वसई विरार शहरात सोमवार रात्रीपासून सुरू ते मंगळवार दिवसभर  झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे व त्यासोबत वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणावर झाडे कोसळली आहेत. नशीब बलवत्तर म्हणून शहरात साधारणपणे 16 ठिकाणी छोटी मोठी झाडे उन्मळून पडली. परंतु कुठं ही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती वसई विरार महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांनी लोकमत ला दिली.

दरम्यान, सोमवार रात्री पासून ते मंगळवार दिवसभर पडत असलेल्या पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शहरातील वसई पूर्व पश्चिम ,सनसिटी, नायगाव,विरार आणि निर्मळ -भुईगाव नालासोपारा आदी ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी झाली नसली तरी इथे वर्षानुवर्षे उभे असलेली मोठाली झाडे ,वड उन्मळून कोसळल्याने खूप नुकसान झाले आहे.

सोमवार आणि मंगळवार  या दोन दिवसांत शहरात वादळी वारे आणि पावसामुळे मोठाली 16 हुन अधिक झाडे कोसळली आहेत. तर मागील दोन दिवसांतील झाडांचा प्रत्यक्षात छोटा ही आकडा पाहता हा आकडा तरीही 25 च्या वर  गेल्या असल्याची माहिती पालिकेनी दिली आहे. एकूणच या आपत्कालीन विभागातील  पालिकेतील अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दोन दिवस दिवसरात्र मदत कार्य पार पाडले तर यासाठी प्रसंगी पालिकेचे कर्मचारी, साहित्य, क्रेन, कटर मशीन, मेक लिप्ट ,हायड्र आदी साहित्य सहीत हे मदत कार्य पार पाडण्यासाठी या सर्वांनी परिश्रम घेतले. खरं तर या मदतकार्य साठी पालिकेतील अजून काही कर्मचारी या आपत्ती पथकात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक आपत्तीच्या वेळेस अग्निशमन दलाचेच कर्मचारी धावत असून ही संख्या कमी असल्याने त्यांना अहोरात्र पडलेली झाडे हटवण्यासाठी झटावे लागत आहे.

वसई विरार शहरात पडझड झालेल्या झाडांची ठिकाण व आकडेवारी

आचोळ        5

विरार पूर्व      2

नालासोपारा  1

सनसिटी       2

वसई गाव      4

नायगाव        2

----------------------

एकूण झाडे   16

-------------------------------

नायगाव पश्चिम कोळीवाडा येथे जुने चिंचेचे झाड कोसळले ! रस्ता बंद

नायगाव पश्चिम भागातील नायगाव कोळीवाडा येथे जोरदार वादळी वाऱ्यामुळे सोमवारी रात्री 1 च्या सुमारास जिल्हा परिषदेच्या शाळे जवळील वर्षानुवर्षे जुने चिंचेचे झाड उन्मळून पडल्याने रस्ता बंद झाला होता तर रात्री घटना घडल्या मुळे जिवीत हानी अथवा कोणीही जखमी झाले नाही अशी माहिती नायगाव कोळीवाडा ग्रामस्थ रामा घुमटेकर यांनी लोकमत ला दिली.

--------------------------------

भुईगाव निर्मळ रस्त्यावर वटवृक्ष कोसळला ; वाहतूक होती बंद !

भुईगाव- निर्मळ मुख्य रस्त्यावर सोमवारी रात्री व मंगळवारी कोसळत असलेल्या वादळी पावसाने या भागातील मोठाला वटवृक्ष मुख्य रस्त्यावर मधोमध कोसळल्याने भुईगाव वरून निर्मळला जाण्याचा रस्ता बराच काळ बंद झाला होता,त्यात लवकरात लवकर पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मोठ्या मेहनतीने या ठिकाणी कटर मशीन, कुर्हाड, हायड्र ,मेक लिप्ट, आदी साहित्य वापरून हे मोठाले झाड कापून बाजूला करण्यात आले व वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू केली,यांसाठी वरील सर्व ठिकाणी नालासोपारा आचोळ फायर स्टेशन व सनसिटी दिवाण मान स्टेशन व त्यांचे फायरमन आदी आपत्ती व्यवस्थापन टीमने विशेष मेहनत घेतली.

Web Title: Traffic jam on Bhuigaon Nirmal road for some time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.