समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले; नववर्षाचे उत्साहात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:58 IST2019-12-31T23:57:56+5:302019-12-31T23:58:03+5:30
पोलिसांचा सर्वत्र कडक बंदोबस्त

समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले; नववर्षाचे उत्साहात स्वागत
डहाणू : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करण्यासाठी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले होते. दरम्यान, थर्टी फर्स्टची पार्टी करताना पार्टीचा अधिकृत परवाना घेतलेल्या हॉटेल्स आणि रिसॉर्टची निवड करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले असले तरी डहाणूत केवळ तीनच परवाने घेतल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आली. त्यामुळे विनापरवाना पार्टी साजरी करणाऱ्या हौशी लोकांना उत्पादन शुल्क खात्याच्या कारवाईपासून वाचण्यासाठी कसरत करावी लागली.
तालुक्यातील प्रसिद्ध पारनाका समुद्रकिनाºयावर सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढल्याने किनारपट्टी भागात गर्दी दिसत आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, बेळगाव, कोल्हापूर, पुणे शहरातील अनेक हौशी पर्यटक समुद्र किनाºयावर दाखल झाले आहेत. सध्या समुद्रकिनाºयावर मिळणाºया ताज्या माशांना चांगल्या प्रकारे आवक आहे. महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याच्या सीमेवरील शहरामध्ये येणारे अनेक पर्यटक हे डहाणू समुद्रकिनाºयाला मोठ्या हौसेने भेट देतात. दरम्यान, मौजमस्ती करण्यासाठी आलेल्या या पर्यटकांच्या पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने करडी नजर ठेवली होती. तसेच सर्वत्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राज्य उत्पादन खात्याकडुन अनेक महत्त्वाच्या नाक्यांवर नाकाबंदी करु न वाहनांची तपासणी सुरु आहे. विनापरवाना पार्टी करणाऱ्यांवर राज्य उत्पादन खाते कारवाई करणार आहे. डहाणूत तीनच परवाने घेतले गेले आहेत.
- विजय वैद्य, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, डहाणू