बापासह मुलाचा तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:25 IST2019-07-15T00:25:34+5:302019-07-15T00:25:40+5:30
वसई पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे व अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी बापासह मुलावर शुक्रवारी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

बापासह मुलाचा तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल
नालासोपारा : वसई पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे व अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी बापासह मुलावर शुक्रवारी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.
वसईच्या पूर्वेकडील परिसरात राहणाºया तरुणीसोबत शेजारी असलेल्या जॉनी परेल (५५) यांनी अश्लील चाळे करून कोणाला याबाबत सांगितले तर जीवे ठार मारीन अशी धमकी दिली होती तर त्याच्याच आरोपी मुलगा सनी जॉनी परेल (१९) याने जानेवारी ते २ जून २०१९ या दरम्यान अत्याचार केल्याने गर्भवती झाली असून कोणाला काही सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी त्यानेही तिला दिली होती.
तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आरोपी सनी परेल याला अटक केली आहे.