शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

युती अन् बविआ आमनेसामने; तुल्यबळ लढतीचे चिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 22:55 IST

लोकसभा निवडणूकीचे पडघम, आचारसंहिता काळात एकमेकांवर लक्ष

पालघर : युती करताना घातलेल्या अटीत भाजपाच्या ताब्यातून खेचून घेतलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्याचवेळी एक तरी लोकसभा मतदारसंघ हाताशी असावा आणि त्यायोगे केंद्रातील सरकारशी वाटाघाटी करता याव्या, यासाठी बहुजन विकास आघाडीलाही या मतदारसंघात विजय मिळवणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातील लढत दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.आपल्या ताब्यातील मतदारसंघ शिवेसेनेला गेल्यामुळे भाजपात असलेली नाराजी गृहीत धरून सध्या शिवेसनेचे नेते काम करत आहेत. पूर्वी शिवसेनेचे नेते असलेले आणि सध्या युतीसोबत राहून मदत करणारे विवेक पंडित यांची येथे शिवसेनेला मदत होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा-शिवसेनेला रोकण्यासाठी बहुजन विकास आघाडीला मदत करण्याचा निर्णय घेतल्यास आणि या मतदारसंघातील काही भागात जोर असलेल्या कम्युनिस्टांसह अन्य छोट्या पक्षांनीही त्यांना साथ दिल्यास येथील लढत चुरशीची होऊ शकते.पालघर लोकसभेचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या अकस्मात मृत्यूने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने त्यांचा मुलगा श्रीनिवास यांना पक्षात घेऊन उमेदवारी देत भाजपाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत ही पोटनिवडणूक जिंकण्याचा चंग त्यांनी बांधला. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळलेल्या आणि अस्वस्थ असलेल्या काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना भाजपाची उमेदवारी देत मुख्यमंत्र्यांनी पहिली खेळी खेळली. आपली संपूर्ण ताकद पणाला लावत वसई तालुक्यात घुसून त्यांनी आपला सहकारी घटक पक्ष, पण निवडणुकीतील विरोधक असलेल्या बविआला रोखण्याचे काम केले.शिवसेनेला पालघर, बोईसर, डहाणू, विक्रमगड भागात बऱ्यापैकी रोखण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले. बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनाही वसई, नालासोपारा या विधानसभा क्षेत्राबाहेर अडवले. साम, दाम, दंड, भेद या राजकीय शस्त्रांचा पुरेपूर वापर करीत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमला रोखून धरले. आपली ताकद पणाला लावीत भाजपने मात्र ही जागा पुन्हा आपल्याकडे खेचून आणली असली, तरी शिवसेना आणि भाजपामध्ये फक्त २९ हजार ५७२ मतांचा फरक राहिला. ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा व ताकद लावली होती ते पाहता हा फरक खूप मोठा नव्हता. मतदारसंघ प्रतिष्ठेचा करूनही फारसे मताधिक्य मिळाले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी लक्षात आणून दिले होते.या निवडणुकी नंतर युतीमध्ये बेबनाव निर्माण होत गेला आणि दोन्ही बाजूने अगदी खालच्या पातळीवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झालेले सर्वांच्यात लक्षात आहेत. तरी ओसरलेली मोदींची लाट आणि काही राज्यात भाजपाच्या विरोधात गेलेला मतदारांचा कौल पाहता केंद्रातील सत्ता पुन्हा टिकवून धरण्यासाठी एका-एका खासदारांची आवश्यकता पाहता मुख्यमंत्र्यांनी स्वत:ला सत्तेच्या संकटात टाकून पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रात युतीला होकार देत पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला दिली. पालघर लोकसभा क्षेत्रातील विक्र मगड, जव्हार आदी अनेक विधानसभा क्षेत्रातील महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करीत आपले राजीनामे दिले असले, तरी केंद्रातील सत्तेसाठी आपल्याला एक-एक मतदारसंघ महत्वाचा असल्याचे पटवून सांगितल्यानंतर हे राजीनामे मागे घेण्यात आले. पण पक्ष आणि परिवारातील नाराजी कायम आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच शिवसेना-भाजपा आणि मित्र पक्षाच्या युतीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगाची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे वनगा आणि बविआच्या उमेदवारांत थेट लढत हाईल. बहुजन आघाडीने अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. त्याचवेळी महाआघाडीचे अजून निमंत्रण आले नसल्याचे बविआचे अध्यक्ष आ. हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले होते. तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी, मार्क्सवाद्यांची ठाकुराना पाठिंबा देण्याबाबत बोलणी सुरू आहेत. पण सध्या भाजापसोबत असताना आता भाजपाविरोधकांची मदत घ्यावी की नाही, याबाबत ठाकूरद्विधा मन:स्थितीत असल्याचे त्यांचे निकटवर्ती सांगतात. राज्यात युती तर जिल्ह्यात मात्र आजही शिवसेना, भाजपात आलबेल नसल्याचा फायदा बविआ कितपत उठवू शकते, हेही महत्वाचे आहे.एकनाथ शिंदेच्या व्यूहरचनेकडे लक्षस्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून दिल्या जाणाºया विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना बविआची मदत घेतली होती. त्यामुळे शिंदे-ठाकूर यांच्यातील संबंध चांगले असल्याचे मानले जाते. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवेळी त्यांनी प्रतिस्पर्ध्याच्या बलस्थानांच्या परिसरातील कामांना मंजुरी देत मतदारांत संभ्रम निर्माण केला होता.आताही ते वसई, विरार, नालासोपारा या बविआच्या बलस्थानांवर लक्ष देतील अशी चिन्हे आहेत. अशी कामे करतानाच भाजपाची मदत मिळणार नाही, हे गृहीत धरून ते ठाकूरांशी असलेल्या संबंधांचा वापर करतील का, याचीही चर्चा सुरू आहे.लोकसभेसाठी १८ लाख १२ हजार ९८३ मतदार असून मागच्या वेळेपेक्षा ही संख्या ८१ हजार ९०६ ने वाढली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा