तलासरीत आज लोकमत आपल्या दारी

By Admin | Updated: July 7, 2016 03:01 IST2016-07-07T03:01:32+5:302016-07-07T03:01:32+5:30

गुरुवारी येथे लोकमत आपल्या दारीचे आयोजन सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृह तलासरी मध्ये आयोजित करण्यात आले आहे.

Today's Lokmat is your doorstep in Talasari | तलासरीत आज लोकमत आपल्या दारी

तलासरीत आज लोकमत आपल्या दारी

तलासरी : गुरुवारी येथे लोकमत आपल्या दारीचे आयोजन सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृह तलासरी मध्ये आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार चिंतामण वनगा, डहाणू विधानसभा मतदार संघाचे आमदार पास्कल धनारे तलासरी पंचायत समितीचे सभापती वनाश्या दुमाडा, उपसभापती भानुदास भोये, लोकमतच्या ठाणे व पालघर आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुमार टेणी तसेच पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तलासरीचे तहसीलदार विशाल दौडकर, गटविकास अधिकारी राहुल धूम इत्यादी सह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या परीसरातील जनतेला त्यांच्या समस्या मांडण्याची व त्यांचे निराकरण करून घेण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार असल्याने त्याचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा असे आवाहन लोकमत परीवाराने केले आहे.
या वेळी मांडल्या गेलेल्या समस्यांचा पाठपुरावा लोकमत करणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Today's Lokmat is your doorstep in Talasari