वसईत आज डॉक्टरांचा मोर्चा

By Admin | Updated: March 20, 2017 01:49 IST2017-03-20T01:49:38+5:302017-03-20T01:49:38+5:30

धुळे येथील डॉक्टरांना झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची कठोर

Today's Doctor's Front in Vasaiet | वसईत आज डॉक्टरांचा मोर्चा

वसईत आज डॉक्टरांचा मोर्चा

वसई: धुळे येथील डॉक्टरांना झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सोमवारी वसईतील डॉक्टर मोर्चा काढणार आहेत.
इंडियन मेडीकल असोसिएशनची वसई शाखा आणि वसई तालुका आयुर्वेदीक ग्रॅज्युएटस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने वसईतील सुमारे दोनशे डॉक्टर धुळे येथे डॉक्टरांना झालेल्या अमानुष मारहाणीचा लोकशाही मार्गाने निषेध नोंदवणार आहेत. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता माणिकपूर क्रीडांगण येथून वसई विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.
त्यानंतर वसई चिमाजी अप्पा मैदानातून वसई तहसिल कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे, अशी माहिती इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वसई अध्यक्षा डॉ.प्रिया चाफेकर आणि वसई तालुका आयुर्वेदीक ग्रॅज्युएटस वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गोविंद पाठारे यांनी दिली.
(प्रतिनिधी)

Web Title: Today's Doctor's Front in Vasaiet