उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची आज विरारला सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:14 IST2018-05-23T00:14:20+5:302018-05-23T00:14:20+5:30

उत्तर प्रदेशमधील नागरिक आणि त्यांच्या विचारांना मानणारा मोठा चाहतावर्ग विरारमध्ये आहे.

Today's Chief Minister of Uttar Pradesh, Virarla Sabha | उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची आज विरारला सभा

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची आज विरारला सभा

पारोळ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी सकाळी पालघरला येणार आहेत. भाजपा-रिपाइं-श्रमजीवी संघटनचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचाराकरता ते येतील. संध्याकाळी ६ वाजता ते मनवेलपाडा तलावाजवळ, विरार पूर्व येथे जनसमुदायाला संबोधित करतील. उत्तर प्रदेशमधील नागरिक आणि त्यांच्या विचारांना मानणारा मोठा चाहतावर्ग विरारमध्ये आहे. त्यांची लोकप्रियता पाहता या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. योगी आदित्याथ यांच्या स्वागत आणि सभा संयोजनासाठी डहाणू, वसई, नालासोपारा, वाडा, मोखाडा, विक्रमगड आणि आजूबाजूच्या शहरांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठी मेहनत घेत आहेत.

Web Title: Today's Chief Minister of Uttar Pradesh, Virarla Sabha