शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

यंदा बारजाई दैवताला दुरूनच दंडवत; कोरोना प्रादुर्भावाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 1:09 AM

आदिवासी समाज निसर्गपूजक असल्याने चांगला पाऊस पडावा यासाठी डहाणू व तलासरी तालुक्यात बारजाई दैवताला साकडे घातले जाते.

बोर्डी : मुबलक पाऊस पडून सगळीकडे आनंदीआनंद नांदावा, याकरिता डहाणू आणि तलासरी तालुक्यातील आदिवासी पश्चिम घाटाच्या रांगांमधील जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीचा बारडा डोंगरावर जाऊन बारजाई देवीकडे साकडे घालतात. काही वर्षांपासून २ जुलै हा जत्रेचा दिवस ठरविण्यात आला असून सुमारे पाच हजार भाविक या स्थळाला भेट देतात, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्याने भक्तांना एकत्रित येऊ नये अन्यथा कारवाईचे संकेत दिले आहेत.

आदिवासी समाज निसर्गपूजक असल्याने चांगला पाऊस पडावा यासाठी डहाणू व तलासरी तालुक्यात बारजाई दैवताला साकडे घातले जाते. जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या रांगा असून महाराष्ट्र - गुजरात सीमाभागात बारडा डोंगर आहे. हा जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीचा डोंगर असून तेथे पाषाणात लेणी कोरलेली असून तेथे बारजाई हे दैवत आहे. या डोंगराला आदिवासी आणि पारसी समाजाचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. बारजाई डोहारा राजाचा हा गड असल्याचा ऐतिहासिक उल्लेख आढळतो. तेथे काळ्या पाषाणात कोरलेली गुहा, भूचर, पाण्याची टाकी आणि उभे स्तंभ आहेत. १४ व्या शतकाच्या प्रारंभी पर्शियातून पारशी समुदाय गुजरातच्या संजाण बंदरात पोहचल्यावर, या शतकाच्या मध्यकाळात दिल्लीच्या सुलताना-पासून समुदाय आणि त्यांच्या पवित्र अग्नीचे संरक्षण करण्यासाठी डोहारा राजाकडे समुदायाने आश्रय घेतला होता. या डोंगरवरील भुयारात राजाने त्यांना एक तपापेक्षा अधिक काळ आश्रय दिल्याचा इतिहास आहे.जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने भक्तांनी या वर्षी दर्शनाला न जाण्याचे आवाहन केले असून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. - बी. एच. भरक्षे, गटविकास अधिकारीया विषाणूची लागण होण्यापासून आदिवासी बांधव सुरक्षित राहावेत याकरिता हे पाऊल उचलण्यात आले असून त्याला ग्रामपंचायतींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. - गोकूळ धोंडी, सरपंच, जांबूगावप्रशासनाच्या आदेशानुसार नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून उपाययोजना आखल्या आहेत. शिवाय त्यांना परिणामांची जाणीव करून देण्यात आली आहे. - जी. एस. बोरसे, ग्रामविकास अधिकारी, अस्वाली ग्रामपंचायत

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस