भाईंदरमध्ये भाजपाची टिफिन बैठक
By धीरज परब | Updated: July 18, 2023 21:56 IST2023-07-18T21:56:08+5:302023-07-18T21:56:26+5:30
मीरा भाईंदर भाजपच्या वतीने भाईंदरच्या रीना मेहता महाविद्यालयात संवाद व टिफिन बैठकचे आयोजन करण्यात आले होते.

भाईंदरमध्ये भाजपाची टिफिन बैठक
मीरारोड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाजनसंपर्क अभियान अंतर्गत मीरा भाईंदर भाजपच्या वतीने भाईंदरच्या रीना मेहता महाविद्यालयात संवाद व टिफिन बैठकचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड. रवी व्यास यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या वतीने आयोजित ह्या टिफिन बैठकी वेळी आमदार गीता जैन, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार संजीव नाईक, संयोजक मनोहर डुमरे, माजी नगरसेवक रोहिदास पाटील, सुरेश खंडेलवाल, नीला सोन्स, विजय राय, दौलत गाजरे, सुमन कोठारी, ललिता दळवी, पंकज पांडेय, महिला अध्यक्षा रिना मेहता आदी सहभागी झाले होते.
पदाधिकारी - कार्यकर्ते आदींनी घरून डब्बे आणले होते. सर्वानी एकत्र बसून विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पक्ष बांधणी व शहरातील समस्यांवर चर्चा केली. देशात २७०० लहान - मोठे पक्ष आहेत. परंतु भाजपा हा एकमेव पक्ष आहे जो कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्यां प्रमाणे मुख्य प्रवाहात सहभागी करून घेत असतो असे सहस्त्रबुद्धे म्हणाले.