गणपती विसर्जन करताना बुडून तिघांचा मृत्यू, वाड्यातील घटनेने हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 02:48 IST2023-09-21T02:45:58+5:302023-09-21T02:48:51+5:30

या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. 

Three people drowned while immersing Ganapati, the incident in the wada | गणपती विसर्जन करताना बुडून तिघांचा मृत्यू, वाड्यातील घटनेने हळहळ

गणपती विसर्जन करताना बुडून तिघांचा मृत्यू, वाड्यातील घटनेने हळहळ

वसंत भोईर -

वाडा : गणपती विसर्जन करताना दोघांचा नाल्यात तर एकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. 

जगत नारायण मौर्य (38), सूरज नंदलाल प्रजापती (25) अशी कोनसई येथील नाल्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर प्रकाश नारायण काचरे (35) याचा गोऱ्हे येथील तलावात बुडून मृत्यू झाल्याचे समजते. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गेले असता, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या घटना घडल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Three people drowned while immersing Ganapati, the incident in the wada