विक्रमगडमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 23:35 IST2018-11-20T23:35:41+5:302018-11-20T23:35:50+5:30
शहरात सोमवारच्या रात्री एका पाठोपाठ तिन ठिकाणी घरफोड्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विक्रमगडमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या
विक्रमगड : शहरात सोमवारच्या रात्री एका पाठोपाठ तिन ठिकाणी घरफोड्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
येथील महाराष्टÑ बॅकेसमोरील दगडीचाळ कॉलनीतील विकास विनायक आळशी हे देवदर्शनासाठी बाहेर गेले असल्याने त्यांच्या घरामध्ये कुणीही नसल्याने चोरटयांनी डाव साधत दरवाजा फोडून रोख रक्कम व सोनेचांदीच्या वस्तू मिळून जवळ जवळ दीड लाखांंची घरफोडी केली आहे़
याबाबत पोलिस स्टेशनमध्ये नोेंद करण्यात आली असून लंकेश गुरव व अशोक गवळी यांच्या घरातही चोरी झाली आहे. तसेच शहरापासून दोन किमी़ अंतरावर असलेल्या गडदे येथील दोन दुकाने फोडून चोरी करण्यात आली आहे़ याबाबत माहितीवरुन पोलिस तपास करीत असून चोरी झालेल्या व्यक्तींनी पोलिसात अधिकृत खबर दिलेली नसल्याचे पोलिस उपनिरिक्षक जि़ बी़ भांगरे यांनी माहिती देतांना सांगीतले़
विक्रमगड शहरामध्ये चोरीचे प्रमाण वाढलेले नसून सोमवारी घडलेल्या घटना टेहळणी करुन चोरी करण्याचा आहे. त्यापूर्वी असे घडलेले नाही. या प्रकरणी कसून चौकशी सुरु असून पोलीस गस्त सुरु झाली आहे.
- मानसिंग पाटील, वरिष्ठ पो.निरीक्षक, विक्रमगड