शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

तलासरी-डहाणूला दोन महिन्यांत भूकंपाचे ७०० धक्के, भूकंपग्रस्तांना मुख्यमंत्री भेटणार की नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:41 IST

पालघर जिल्ह्यातील तलासरी आणि डहाणू तालुक्यात ११ नोव्हेंबर पासून भूकंपाचे कमी-अधिक तीव्रतेचे सुमारे ७०० धक्के बसल्याची नोंद भूकंप मापक यंत्राने घेतल्याची माहिती आहे.

पालघर - जिल्ह्यातील तलासरी आणि डहाणू तालुक्यात ११ नोव्हेंबर पासून भूकंपाचे कमी-अधिक तीव्रतेचे सुमारे ७०० धक्के बसल्याची नोंद भूकंप मापक यंत्राने घेतल्याची माहिती असून ४.१ रिष्टर स्केल च्या धक्क्याने जिल्हाप्रशासनाची झोप उडवून टाकली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायमस्वरूपी भूकंपमापन केंद्र उभारण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिली.जिल्ह्यात एकामागोमाग सुरू झालेल्या भूकंपाच्या पाशर््वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ह्या भूकंपा दरम्यान सर्व शासकीय अधिकारी व विविध प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास करण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती सादर केली. ह्यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नवनाथ जरे आदी उपस्थित होते. या बैठकीला रिलायन्स गॅस पाईपलाईन, डहाणू थर्मल पॉवर स्टेशन, तारापूर अणू ऊर्जा प्रकल्प, सूर्या प्रकल्प आदी प्रकल्पांच्या अधिकाºयांनी त्यांच्या प्रकल्पामध्ये घेतल्या जात असलेल्या दक्षतेबाबतचे सादरीकरण केले. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन दक्ष असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आश्रमशाळांच्या आवारात तात्पुरती सोय म्हणून तंबू उभारले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या आवारातही आणखी तंबू उभारले जातील. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून न जाता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले असता मागील ३ महिन्यांपासून विद्यार्थी भीतीने शाळेतच येत नसल्याने त्यांचा अभ्यासक्रम बुडाल्याने एन परीक्षेच्या तोंडावर प्रशासनाने त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या काही उपाययोजना आखल्या आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यावर शिक्षणाधिकाºयांच्या बैठकीत त्या संदर्भात उपाय योजले जातील असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.यावेळी कुर्झे धरणाच्या डागडुजीसाठी निधीची मागणी करण्यात आली असून सर्वेक्षण केलेल्या १ हजार ५०० घरापैकी १ हजार ३०० घरांना नुकसानभरपाई देणे, घर बांधणीसाठी स्थानिक गवंड्यांना प्रशिक्षण देणे, गंजलेले विद्युत खांब तात्काळ बदली करणे, हैद्राबाद आणि दिल्ली येथील तांत्रिक यंत्रणा मार्फत सिस्मोमीटर बसवून भूकंपाचे नियमित विश्लेषण करणे, कायमस्वरूपी सिस्मोग्राफीक सेंटर उभारणे आदी बाबत निर्णय घेण्यात आले.तिच्या कुटुंबीयांना भरपाई नाहीचभूकंपा दरम्यान जीव वाचिवण्यासाठी घरातून बाहेर पळणाºया। या दोन वर्षीय मुलीचा दगडावर आपटून झालेला मृत्यू मिळणाºया नैसर्गिक आपत्तीच्या भरपाईच्या निकषात बसत नसल्याने तिच्या कुटुंबियांना कुठलीही आर्थिक मदत मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहाय्यता फंडातून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे.मागील ३ महिन्यापासून तलासरी,डहाणू मध्ये एकावर एक भूकंपाचे धक्के बसून ग्रामस्थ जीव मुठीत धरून आपले जीवन जगत असून अत्यंत भयावह परिस्थिती उद्भवली आहे. वाडा आणि सातपाटी येथे कार्यक्र मासाठी येणाºया मुख्यमंत्र्यांना हाकेच्या अंतरावर असलेल्या भूकंपग्रस्त भागातील जनतेची भेट घ्यावीशी वाटली नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उद्या ते भूकंपग्रस्तांची भेट घेणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपVasai Virarवसई विरार