एकाच रात्रीत तीन ठिकाणी जबरी चोऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 03:14 IST2018-03-22T03:14:41+5:302018-03-22T03:14:41+5:30

मंगळवारी रात्री कार मधून आलेल्या चोरट्यांनी पारोळ फाट्यावरील ध्रुव संगणक केंद्र, कोपर गावातील शिवरान वझे, रेश्मा किणी, यांचे घर या ठिकाणी लाखो रु पयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला.

 Thieves in three places in one night | एकाच रात्रीत तीन ठिकाणी जबरी चोऱ्या

एकाच रात्रीत तीन ठिकाणी जबरी चोऱ्या

पारोळ : मंगळवारी रात्री कार मधून आलेल्या चोरट्यांनी पारोळ फाट्यावरील ध्रुव संगणक केंद्र, कोपर गावातील शिवरान वझे, रेश्मा किणी, यांचे घर या ठिकाणी लाखो रु पयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला.
संगणक केंद्रातुन दोन लॅपटॉप, पंचवीस हजाराची रोकड, वझे यांचा घरातून चार हजार रु पये तर किणी यांच्या घरातून आठ हजार रु पये चोरटयानी लांबवले. या तिन्ही ठिकाणी दरवाजे तोडून चोºया करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या कारमधील हालचाली पारोळ फाटया वरील सीसीटीवीमध्ये कैद झाल्या आहेत. या घटनांची नोंद मांडवी पोलिसचौकीमध्ये झाली आहे. दरम्यान, आमच्या मालमत्तेचे रक्षण होत नसल्याचे ध्रुव संगणकचे निलेश पाटील यांनी लोकमतला सांगीतले.

Web Title:  Thieves in three places in one night

टॅग्स :Crimeगुन्हा