शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

विधवा, अपंग, निराधारांना ५ महिने अनुदान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 4:11 AM

केंद्र शासनाच्या तसेच राज्यशासनाच्या संजय गांधी निराधार योजनांतर्गत डहाणूतील बारा हजार वृध्द, अपंग, अविवाहित, विधवा कुष्ठरोगी निराधार यांना गेल्या पांच महिन्यापासून अर्थसहाय्य न मिळाल्याने दारिद्रय रेषेखालील या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

डहाणू  - केंद्र शासनाच्या तसेच राज्यशासनाच्या संजय गांधी निराधार योजनांतर्गत डहाणूतील बारा हजार वृध्द, अपंग, अविवाहित, विधवा कुष्ठरोगी निराधार यांना गेल्या पांच महिन्यापासून अर्थसहाय्य न मिळाल्याने दारिद्रय रेषेखालील या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्हयात गोर गरीब व निराधारांना शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत मिळणारे धान्य ही गेल्या पाच वर्षापासून मिळत नसल्याने विविध आजाराने त्रस्त तसेच अंध, अपंग, निराधारांचे हाल होत आहे. समाजातील दीनदुबळे, अपंग, मागासवर्गीय जाती, जमाती याबरोबरच समाजातील वयोवृध्द, अपंग निराधार, क्षयरोगी, अविवाहित, घटस्फोटीत महिला, विधवा, कुष्ठरोगी, अंध, गंभीर आजाराने पिडित तसेच एड्सग्रस्त व्यक्तींना केंद्र व राज्य शासनाकडून दर महा चारशे तसेच सहाशे रूपये अर्थसहाय्य दिले जाते. साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात वरील योजनेअंतर्गत बारा हजार लाभार्थ्यांना दर महा त्यांच्या बँकखात्यात अनुदान जमा केले जाते. परंतु गेल्या दोन वर्षापासून राज्यशासनाकडून तालुक्याला मिळणारे अनुदान वेळेवर म्हणजेच दर महिन्याला मिळत नसल्याने गोर-गरीबांचे हाल होत आहे. डहाणू तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले दिवसी, भवाडी, मोडगाव, वंकास, महालक्ष्मी, इत्यादी बहुसंख्या दारिद्रयरेषेखालील लाभार्थी शासनाच्या या योजनेच्या अनुदानवरच उदरनिर्वाह करीत असल्याने गेल्या पाच सहा महिन्यापासून त्यां बँक खात्यात पैसेच जमा न झाल्याने सुमारे ६० कि.मी. चा प्रवास करून हजारो लाभार्थ्यांवर दरमहा गंजाड येथील बँकेत हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.दिवसेंदिव भडकणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झालेले असतांनाच शासनाकडून या निराधारांना तुटपुंजे अनुदान मिळते ते ही दर महा वेळेवर मिळत नसल्याने त्यांचे पैशाअभावी हाल होत आहे.यातील बहुसंख्य लाभार्थ तर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरात भीक मागणारे स्थानिक आदिवासी आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबाचाकिंवा इतर कुणाचाही आधार नसल्याने त्यांची दयनिय अवस्था झालीआहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या