There is no grain in the house, will the family eat? | घरात एकही दाणा राहिलेला नाही, कुटुंब खाणार काय?
घरात एकही दाणा राहिलेला नाही, कुटुंब खाणार काय?

भातसानगर : शहापूर तालुक्यात पावसाने कहर केल्याने भातपिके हातची गेली. यामध्ये लष्करी अळीनेही होत्याचे नव्हते केल्याने आवरे येथील शेतकरी भातपिकाबाबतीत नेस्तनाबूत झाला आहे. असे कोणतेही वर्ष नाही की, जे शेतकऱ्याला फलदायी ठरले. मात्र, तरीही शेतकºयाने संकटांचा सामना करत तग धरला. मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी असून सतत पडणाºया पावसाने सारीच शेती बेचिराख झाल्याने शेतकरीच देशोधडीला लागला आहे.

आवरे येथील दत्तू बाबू किरपण या शेतकºयाने आपल्या दीड एकरच्या शेतात भातपिकाची लागवड केल्यानंतर त्याने योग्य खतांचा वापरही केला. शेतात आलेले गवत (बेननी), वाढलेले भातपीक मुसळधार पावसातही तग धरून उभे राहिले. हिरव्यागार दिसणाºया भाताच्या पातीने हळूहळू रंग बदलायला सुरुवात केली. पण, जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे भाताच्या लोंबीचा सतत पडणाºया पावसामुळे चेहरामोहरा बदलला. पावसामुळे या भातावर पडलेल्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढल्याने आज एकही दाणा या शेतकऱ्यांच्या घरात गेलेला नाही. शिवाय, त्यांनी सेवा सोसायटीचे कर्ज घेतले असून ९७ हजार रु पये थकबाकी त्यांच्यावर असल्याने आता ही भरायची कशी, असा गहन प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. तीन मुलांचा सांभाळ करणे, त्यातच दोन मुलांचा शिक्षणाचा खर्च करणे आता कसे झेपणार, ही चिंताही सतावत आहे.

Web Title: There is no grain in the house, will the family eat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.