शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कोरोना नियंत्रण मोहिमेत शिक्षकांना विमाकवच नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 12:00 AM

भीतीचे वातावरण : महिनाभरात १४ शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू

शशिकांत ठाकूर

कासा : देशासह राज्यात व जिल्ह्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असून, साथीरोग नियंत्रणात अनेक वेळा शिक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारची कामे केली आहेत.  त्यामुळे शिक्षकांना कोरोना लागण होऊन मृत्यू झाला आहे. मात्र, कोरोना नियंत्रण मोहिमेत शिक्षकांना विमा कवचच नाही. त्यामुळे अशा मृत्यू पावलेल्या शिक्षक कुटुंबीयांना हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे.

पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये डहाणू  तालुका  तालुका ४६०, जव्हार तालुका २२८,  पालघर तालुका ४०७, मोखाडा तालुका १५५, तलासरी तालुका १५५, विक्रमगड तालुका २३६, वसई तालुका १९४ व वाडा तालुका २९६ अशा एकूण २१३१  शाळा आहेत, तर शिक्षक डहाणू १३६८, जव्हार ५५६, पालघर ९९५, मोखाडा ३९२, तलासरी ५५८, विक्रमगड ६६७, वसई ७८०, वाडा ७४६ असे एकूण ६०२२ शिक्षक कार्यरत आहेत.  दरम्यान, मागील लाॅकडाऊन काळात काही शिक्षकांना कोरोना सेंटर, गावागावात आरोग्य सर्वेक्षणाची कामे लावण्यात आली होती, तसेच ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहेत, अशा ठिकाणी आशासेविकांबरोबर  जाऊन घरोघरी ताप, खोकला, सर्दी आदी रुग्ण असल्याचे सर्व्हे करणे, तापमान मोजणे आदी कामे लावली होती.     तर १ एप्रिल ते १५ एप्रिलमध्ये डहाणू २, वसई-विरार ३, वाडा १ जव्हार १ असे एकूण सात शिक्षकांचा मृत्यू झाला होता, तर त्यानंतर  सहा ते सात  अशा एकूण सुमारे चौदा शिक्षकांचा मृत्यू  मागील महिनाभरात झाला आहे.

शिक्षकांना घरोघरी जाऊन करावी लागतात कामेकर्तव्य बजावताना, काही शिक्षकांना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला होता, तर शाळा सुरू झाल्यावर कोरोना काळात १ मार्च ते १० मार्चदरम्यान घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण काम शिक्षकांना लावण्यात आले होते. यामध्ये गजबजलेल्या वस्त्या, रेल्वे स्थानके, वीटभट्टी, दगडखाणी, मोठी बांधकामे, स्थलांतरित कुटुंबे, झोपड्या, चाळी येथून शाळाबाह्य मुलांना शोधण्याचे काम शिक्षकांना दिले होते. यात प्रत्यक्षात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे लागत असल्याने, सुमारे ५० शिक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार