शिक्षिकेची विद्यार्थिनीला पट्टीने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 06:21 IST2019-04-14T06:21:29+5:302019-04-14T06:21:35+5:30

जे. डी. आयिडयल शाळेच्या शिक्षिकेने शुक्रवारी चौथीतल्या एका विद्यार्थिनीला लाकडी पट्टीने डोक्यात मारहाण केली.

The teacher of the teacher beat the strip | शिक्षिकेची विद्यार्थिनीला पट्टीने मारहाण

शिक्षिकेची विद्यार्थिनीला पट्टीने मारहाण

नालासोपारा : जे. डी. आयिडयल शाळेच्या शिक्षिकेने शुक्रवारी चौथीतल्या एका विद्यार्थिनीला लाकडी पट्टीने डोक्यात मारहाण केली. त्यामुळे तिच्या डोक्याला सूज आली असून तिला उपचारासाठी जवळच्या रु ग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.
पूर्वेकडील आचोळे रोडवरील द्वारका हॉटेलच्या समोरील न्यू झालावाड दर्शन इमारतीमध्ये राहणारी संध्या मिश्रा ही अलकापुरी विभागातील जे. डी. आयडियल शाळेच्या हिंदी माध्यमाच्या चौथीत शिकते. शुक्र वारी वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर होता. दुपारी पेपर देऊन झाल्यानंतर मैत्रिणीसोबत मस्ती करत असताना इंग्रजी माध्यमातील रोझी या शिक्षिकेने त्यांना दम दिला.
संध्यानी टोपी घातली असल्याने तिला टोपी काढण्यास सांगितले. तिने नकार देताच शिक्षिकेने डोक्यावरील टोपी फेकून दिली व लाकडी पट्टीने तीन ते चार वेळा डोक्यावर मारल्याने ती घाबरली. शाळेत घेण्यासाठी आलेल्या आईला संध्याने घडलेला प्रकार सांगितला. आईने विचारल्यावर शिक्षिकेने थातुरमातुर उत्तर दिले. घरी आल्यावर संध्याला डोक्यात सूज आल्याने तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेताना ती दोन वेळा बेशुद्ध झाली. तिच्या डोक्याचे एमआरआय केले आहे.
>शिक्षिकेने पट्टीने मारल्याने संध्याच्या डोक्यात सूज आली असल्याने तिला रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
- मिथिलेश मिश्रा, संध्याचे वडील
आम्ही मुलीची जबानी घेण्यासाठी घेतली आहे. शाळेत नेमके काय घडले याची चौकशी करून दोषी शिक्षिकेविरोधात पुढील कारवाई केली जाईल.
- डॅनियल बेन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे

Web Title: The teacher of the teacher beat the strip