शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

वायुप्रदूषण तपासणारे तारापूरचे स्टेशन सव्वा वर्षापासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 3:50 AM

लाखो खर्चून केली होती उभारणी; प्र.नि.मंडळ म्हणते पुन्हा चालू करू

- पंकज राऊतबोईसर : तारापूरला वायू प्रदूषणाची प्रचंड समस्या असतांनाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयाच्या इमारतीवरील हवेची गुणवत्ता तपासणारे व २०१२ साली लाखो रुपये खर्चून कार्यान्वित केलेले स्टेशन सव्वा वर्षा पासून अक्षरश: धूळ खात पडले आहे ते पूर्ववत सुरू करण्या संदर्भात काहीही हालचाल सव्वा वर्षा पासून दिसत नसल्याने ते बंद ठेवण्या मागे कुणाचे हित जपले जाते आहे? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.तारापूर एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जे.एस.डब्ल्यू.स्टील लि. ( जिंदाल स्टील) या कारखान्याने सप्टेंबर २००९ साली ३० मेगावॅट क्षमतेचे कोळशावर चालणारे थर्मल पॉवर स्टेशन सुरू केल्या नंतर हवा व ध्वनी प्रदूषणाची मोठया प्रमाणात समस्या निर्माण होऊ लागल्याच्या तक्रारी म.प्र. नि. मंडळाकडे येताच प्रदूषण होऊ नये म्हणून काही उपाय योजना व सुधारणा सुचवून मंडळाने हवेची गुणवत्ता तपासणारी तीन स्टेशन्स एमआयडीसी मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इन्स्टॉल करण्याचे निर्देश जे.एस.डब्ल्यू.स्टीलला दिले त्या पैकी हे एक स्टेशन होते.सुमारे साठ लाखाचे एक अशी तीन युनिट कार्यान्वित केली गेली त्या पैकी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयाच्या इमारती वर दिनांक २४ एप्रिल २०१२ रोजी हे पहिले स्टेशन सुरू केले गेले. या स्टेशन मधील अद्यावत तंत्राद्वारे पीएम २.५ (हवेतील तरंगणारे धूलीकण पीएम २.५ मायक्रोन ) पीएम १० (हवेतील तरंगणारे धुलीकण १० मायक्रोन ), सीओ (कार्बन मोनोआॅक्साईड), एस ओ २ (सल्फर डायआॅक्साईड), एन ओ २ (नायट्रोजन डाय आॅक्साईड) इत्यादींचे हवेतील प्रमाण मोजून हवेची गुणवत्ता तपासली जाऊन ती कार्यालया बाहेरील फलकावर लिहिण्यात येत होते. आता स्टेशन बंद झाल्याने तो फलक ही धूळ खात पडला आहे सुरुवातीची काही वर्ष सोडल्या नंतर त्या स्टेशन मध्ये संकलित होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या नोंदी (रिपोर्ट) धोक्याच्या पातळीच्या आत आहेत की त्यांनी पातळी ओलांडली आहे याची कोणतीही माहिती दिली जात नाही. म.प्र. नि. मंडळ हे एम. आय. डी. सी तिल उद्योगाची तपासणी करून दोषींवर कारवाईचा बडगा उचलते मग आपल्याच इमारती वर असलेले स्टेशन सव्वा वर्षा पासून बंद राहण्यास जबाबदार कोण याचा शोध ते कधी घेणार व दोषींवर कारवाई कधी करणार? असा प्रश्न आहे.आता जबाबदारी येऊन पडली मंडळावरसर्वात महत्त्वाचा प्रश्न आता असा आहे की जे. एस. डब्ल्यू. स्टील लि. या कारखान्याने ३० मेगावॅट क्षमतेचे कोळशावर चालणारे सप्टेंबर २००९ साली सुरू केलेले थर्मल पॉवर स्टेशन बंद केले डिसेंबर २०१७ ला त्याचा संपूर्ण गाशा गुंडाळून तामिळनाडू मध्ये त्याचा प्लांट उभारला.तारापूर येथील त्या थर्मल पॉवर स्टेशनची कन्सेंट ही महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळा कडे सरेंडर केल्याने आता हवेची गुणवत्ता तपासणारे स्टेशन चालविण्याची जबाबदारी जे एस डब्ल्यूवर न राहिल्याने ते स्टेशन पुन्हा चालू करून कार्यान्वित करण्याची कायदेशीर जबाबदारी म.प्र. नि. मंडळावर आली आहे.बंद असलेले स्टेशन जे. एस. डब्ल्यू . स्टील किंवा अन्य एखाद्या उद्योगाच्या साहाय्याने पुन्हा सुरू करण्यात येईल आणि या माध्यमातून ते सुरू करण्यास यश न आल्यास म.प्र. नि.मंडळ ते चालवेल- एम .आर. लाड, प्रादेशिक अधिकारी, म.प्र. नि.मंडळ ठाणे

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण