ताडपत्री तहसील कार्यालयातच पडून; पालघर प्रशासनाचा असाही मुर्दाडपणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 00:08 IST2019-02-15T00:08:21+5:302019-02-15T00:08:39+5:30
तलासरी, डहाणू तालुक्यात भूकंपाच्या धक्क्याने जनता भयभीत झाली आहे. भूकंपाच्या धक्क्याने घर कधी पडेल व आपल्याला जीव गमवावा लागेल या भीतीने ग्रामस्थ घरात न झोपता घराबाहेर उघड्यावर थंडीवाऱ्यात झोपत आहेत.

ताडपत्री तहसील कार्यालयातच पडून; पालघर प्रशासनाचा असाही मुर्दाडपणा
- सुरेश काटे
तलासरी : तलासरी, डहाणू तालुक्यात भूकंपाच्या धक्क्याने जनता भयभीत झाली आहे. भूकंपाच्या धक्क्याने घर कधी पडेल व आपल्याला जीव गमवावा लागेल या भीतीने ग्रामस्थ घरात न झोपता घराबाहेर उघड्यावर थंडीवाऱ्यात झोपत आहेत. पण याचे सोयरसुतक शासकीय यंत्रणेला नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे भूकंप पीडितांसाठी आलेल्या ताडपत्री आठ दिवस झाले त्या न वाटता तलासरी तहसील कार्यालयात पडून आहेत.
तलासरी, डहाणू तालुक्यात भूकंप धक्क्याने ग्रामस्थ घराबाहेर आहेत. उशिरा झोपेतून उठलेल्या शासकीय यंत्रणेने या भागात तंबू टाकले पण त्याची संख्या नगण्य
असल्याने लोकांनी जिल्हाधिकाºयांकडे ताडपत्रीची मागणी केली जिल्हाधिकाºयांनी लोकांची मागणी तात्काळ मान्य करून तालुका महसूल कार्यालयात त्या पाठविल्या पण त्याचे भूकंप पिडितांना तत्काळ वाटप न करता त्या आठ दिवसांपासून तलासरी तहसील कार्यालयात पडून असल्याने त्याचा फायदा भूकंप पीडितांना होत नाही.
- भूकंपाने ग्रामस्थ हैराण असताना त्यांना शासनाकडून म्हणावी तशी मदत अजून मिळालेली ती देण्यास यंत्रणा उदासीन आहेत त्याच प्रमाणे स्वत:ला आदिवासी समाजाचे पुढारी म्हणवणारेही याबाबत उदासीन आहेत कदाचित ते लोकांनी धक्का देण्याची वाट पाहत असावेत. याबाबत तलासरीच्या स्वाती घोंगडे यांनी सांगितले १७० ताडपत्र्या तलासरी साठी आल्या त्या पैकी ९६ ताडपत्री वाटप करण्यात आल्या बाकीच्या ताडपत्री नेण्यास गावचे सरपंच व ग्रामसेवक आलेच नाहीत.