नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपीचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: July 7, 2017 19:33 IST2017-07-07T19:33:57+5:302017-07-07T19:33:57+5:30

नालासोपारा पोलीस ठाण्यात पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. महेश मनोहर मुलमुले असे या मृत आरोपीचे नाव असून तो विलेपार्लेचा राहणारा आहे.

Suspected death of accused in Nalasopara police station | नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपीचा संशयास्पद मृत्यू

नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपीचा संशयास्पद मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 07 - नालासोपारा पोलीस ठाण्यात पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. महेश मनोहर मुलमुले असे या मृत आरोपीचे नाव असून तो  विलेपार्लेचा राहणारा आहे. 
मयत आरोपीवर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान 420, 406 अनव्ये गुन्हा दाखल होता. त्याला वसई न्यायालयाने पोलीस  कोठडी दिली  होती. अर्नाळा पोलीस ठाण्यात पोलीस कोठडी नसल्याने त्याला नालासोपारा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. गुरुवारी रात्री 11.05 वाजता त्याला कस्टडी मध्ये उलट्या सुरु झाल्याने त्याला वसई विरार पालिकेच्या नालासोपारा येथील  रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी साडे सात वाजल्या पासून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण  संध्याकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. 
आरोपीने कस्टडीत विष प्राशन केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पण याची सत्यता शवविच्छेदन झाल्यानंतरसमोर येणार आहे. याप्रकरणी  पोलीस अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहेत.
 

Web Title: Suspected death of accused in Nalasopara police station